शहीद टिपू सुलतान जयंतीला रक्तदान शिबिर तर भारतरत्न मौलाना आज़ाद जयंतीनिमित्त अन्नदान वाटप-ॲड. प्रा. इलियास इनामदार

शहीद टिपू सुलतान जयंतीला रक्तदान शिबिर तर भारतरत्न मौलाना आज़ाद जयंतीनिमित्त अन्नदान वाटप-ॲड. प्रा. इलियास इनामदार
बीड/प्रतिनिधी
देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद पाच दिवसीय महोत्सव बीडला साजरा होत आहे, पहिला दिवस नऊ नोव्हेम्बरला राष्ट्रीय कवी अल्लामा इक़बाल यांच्या जयंती व आंतरराष्ट्रीय उर्दू दिनानिमित्त उर्दू मुशायरा (कवी सम्मलेन) घेण्यात आले दहा नोव्हेम्बरला शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले व अकरा नोव्हेम्बरला भारतरत्न मौलाना आज़ाद यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीबांना लंगर अन्नदान करण्यात आले व पुढील कार्यक्रम बारा व तेरा नोव्हेम्बरला सकाळी 11 ते सायं.5 वाजेपर्यंत दोन दिवसीय शैक्षणिक व ऐतेहासिक प्रदर्शन एग्जिबीशन ठेवलेले आहे व तेरा नोव्हेम्बरलाच सायं 6 वाजता इक़बाल टिपू आज़ाद कॉन्फ्रेंस म्हणजेच जाहिरसभा व्याख्यान ठेवलेले आहे प्रदर्शन व व्याख्यान मध्ये शहरवासियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार व निमंत्रक शहीद टिपू सुलतान उत्सव समिति बीडच्या वतीने खैसर बेग लोकसेना संघटना जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, गुलाम साकिब सर, मिर्ज़ा नदीम बेग, मौलाना ज़फर काज़ी, ॲड. कलीम काज़ी शेख अयाज़ अखतर, समीर शेख, शेख रज़ी, शेख नदीम मेंबर, आमेर मदनी, नवीद इनामदार, समाजसेवक शेख मोहसिन, शेख अफ्फान काज़ी वज़ीरोद्दीन व सर्व समिति सदस्यांनी केली आहे.
