कु. हर्मिका जगतकर हिचा मातृभूमी प्रतिष्ठान कडून गुणगौरव व सत्कार

कु. हर्मिका जगतकर हिचा मातृभूमी प्रतिष्ठान कडून गुणगौरव व सत्कार
बीड/प्रतिनिधी
दि. 13 मातृभुमी प्रतिष्ठान संचलित,अखिल भारतीय संत भगवानबाबा वंजारी समाज वधू-वर नोंदणी महासंघ (वंजारी विश्व) बीड आयोजित राज्यस्तरीय 15 वा सर्व शाखीय वंजारी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा व विविध क्षेत्रातील, यश संपादन करणाऱ्या व उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांचा आज बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे संपन्न झाला.याप्रसंगी विविध क्षेत्रातील गुणवत्ता व प्राविण मिळवलेल्या अनेक जणांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यामध्ये तुळशी इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कुमारी हार्मिका बालाजी जगतकर, कलाक्षेत्रातून सलग तीन वर्ष फॅशन शो स्पर्धेत प्रथम मिळवल्याबद्दल पालकांचा सत्कार करण्यात आला.
यासमयी महंत ह.भ.प.राधाताई महाराज स्त्री रोग तज्ञ डॉ. सारिका सिरसागर ,ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे,रामदास हंगे,इंजि.उत्तमराव मिसाळ,डॉ.संजय आंधळे,पांडुरंग जायभाये,केशव नागरगोजे,बाबासाहेब जायभाये यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.