दंड वसुलीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट!

दंड वसुलीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट!
बार्शी नाका चौकात मोबाईलवर बोलत असल्याचा कारण देत दिला एक हजाराचा दंड!
बीड/वार्ताहार
शहरातील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात वाहतूक शाखा अग्रेसर असल्याचं दिसते मात्र कारवाईत काही पोलीस कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याचा ही समोर येत आहे आज बार्शी नाका चौकात पोलीस कर्मचाऱ्यांकडून एकाला डॉक्युमेंट्स क्लिअर असतानाही तू मोबाईलवर बोलत असल्याचा कारण देत एक हजार रुपयांचा दंड दिला.
बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आल्यापासून जिल्ह्यात बऱ्याच पैकी सुधारणा पाहण्यास मिळत आहे परंतु काही पोलीस कर्मचारी सुधारणा करण्याऐवजी बिघडण्याचे काम करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते यामुळे पोलीस दलाचा नाव खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज बार्शी नाका चौकात वाहतूक शाखेकडून नियमाची पायमल्ली करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येत होती कारवाई करताना शेख अफरोज नामक व्यक्ती आपल्या पत्नी सोबत टू व्हीलर वरती जात असताना पोलीस कर्मचाऱ्याकडून त्याला अडवण्यात आलं त्यांनी डॉक्युमेंट्स दाखविल्यानंतर त्याचे फोटो काढण्यात आले फोटो काढताना त्यांनी विचारले असता फोटो कशासाठी काढता त्यावर तो कर्मचाऱ्यांनी सांगितले की तू मोबाईल वरती बोलत होता मी माझ्या डोळ्यांनी पाहिले प्रश्न हा निर्माण होतो की जर तो मोबाईल वरती बोलत होता तर चलन पाडताना दुसरा फोटो का काढला? त्याचे डॉक्युमेंट सगळे क्लियर असतानाही त्याला एक हजाराचा चलन दंड का दिला? तो व्यक्तीकडून सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची मागणी देखील केली परंतु उपयोग झाला नाही नियम होणाऱ्या वर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे परंतु विनाकारण चलन फाडणाऱ्या चा काय? त्यांच्यावर कोण कारवाई करणार? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.
