महापरिनिर्वाण दिनाला २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा परिणाम वाईट होतील- राजेंद्र पातोडे.

महापरिनिर्वाण दिनाला २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा परिणाम वाईट होतील- राजेंद्र पातोडे.
अकोला/वार्ताहर
दि. २३ - विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महापरिनिर्वाण दिनाला विदर्भ महाराष्ट्रसह २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनसाठी जळगाव स्थानकात यार्ड, रिमॉडेलिंगचे काम सुरू करण्यात आले आहे.या कामासाठी जाणीवपूर्वक ५ व ६ डिसेंबर २०२२ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. म्हणून हावडा ते मुंबई मार्गावरील विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेससह अप व डाऊन अशा ३८ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हा निर्णय संतापजनक असून हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा अन्यथा देशभर ह्याचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नसल्याचा इशारा वंचित बहूजन युवा आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.
जगभर विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमी येथे अभिवादन करायला येत असतात ह्याची जाणीव असतांना रेल्वेच्या वतीने हा निर्णय घेऊन आंबेडकरी अनुयायांना वेठीस धरण्याचा डाव आखला आहे.केंद्र सरकारने हया निर्णयाचा पुनर्विचार करावा, आंबेडकरी अनुयायांच्या भावनांशी खेळ करू नये असे आवाहन देखील युवा आघाडीने केले आहे.
हे प्रकार सहन केले जाणार नसून रद्द करण्यात आलेल्या २२ गाड्या अकोला रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या असल्यामुळे आंबेडकरी अनुयायी आणि इतर प्रवाशांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी हा बिनडोक आणि द्वेषपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.
रेल्वेच्या वतीने रद्द केलेल्या तसेच काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत.त्यामध्ये
• नागपूर-पुणे: ५ डिसेंबर
• पुणे - नागपूर : ६ डिसेंबर
• नागपूर-पुणे गरीबरथ: ४ डिसेंबर
• पुणे - नागपूर गरीबरथ: ५ डिसेंबर
• पुणे-बिलासपूर: ५ डिसेंबर
• बिलासपूर-पुणे : ६ डिसेंबर
• नागपूर-सीएसएमटी : ५ डिसेंबर
• सीएसएमटी- नागपूर: ५ डिसेंबर
• सूरत-अमरावती : ४ डिसेंबर
• अमरावती-सूरत: ५ डिसेंबर
• नागपूर-अहमदाबाद : ४ डिसेंबर • अहमदाबाद-नागपूर : ५ डिसेंबर
• कोल्हापूर-गोंदिया : ५ डिसेंबर
• गोंदिया- कोल्हापूर : ५ डिसेंबर
• नागपूर-मडगाव : ३ डिसेंबर
• मडगाव-नागपूर : ४ डिसेंबर जबलपूर-पुणे: ४ डिसेंबर
• पुणे-जबलपूर : ५ डिसेंबर
• अमरावती-सीएसएमटी : ५ डिसेंबर
• सीएसएमटी-अमरावती : ६ डिसेंबर
• सीएसएमटी-गोंदिया : ४ डिसेंबर
• गोंदिया-सीएसएमटी : ५ डिसेंबर
हावडा-अहमदाबाद, पुरी-ओखा एक्स्प्रेसचा मार्ग बदलला.
● मेगा ब्लॉकमुळे हावडा- अहमदाबाद, पुरी-ओखा एक्स्प्रेससह काही गाड्यांच्या नियमित मार्गात बदल करण्यात आला आहे.या गाड्या भुसावळ कार्ड लाईन- खंडवा-इटारसी-रतलाम-छायापु रीमार्गे वळविण्यात आल्या आहेत तर अमृतसर-नांदेड एक्स्प्रेस खंडवा-भुसावळ कार्ड लाईन-अकोला-पूर्णामार्गे वळविण्यात आली आहे.महापरिनिर्वाण दिनाचे गांभिर्य न जपणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा वंचित बहूजन युवा आघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
