राज्य उत्पादन शुल्क, बीड विभागाची अवैध स्पिरीट विक्री वर मोठी कारवाई

राज्य उत्पादन शुल्क, बीड विभागाची अवैध स्पिरीट विक्री वर मोठी कारवाई
बीड/वार्ताहर
मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई श्री. डॉ. विजय सूर्यवंशी सर, संचालक (अं.व द.), राज्य उत्पादन शुल्क, श्री. सुनील चव्हाण, विभागीय उप आयुक्त, रा.उ.शु.औरंगाबाद, श्री.पी.एच.पवार आणि प्र. अधीक्षक रा.उ.शु. बीड श्री. अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेच्या दृष्टीने जिल्हयात विविध ठिकाणी वाहन तपासणी चालू असताना प्र. निरीक्षक भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क बीड यांनी हॉटेल गिरीजा, कोळगाव शिवार मादळमोही अहमदनगर रोड तालुका गेवराई जिल्हा बीड येथे संशयितरित्या उभें असलेले MH- १७ BY- 7251 टँकर पाहून गाडी थांबवली असता सदरील टँकर विपकृत मद्यार्क स्पिरिट वाहतूक करणाऱ्या टँकर मधून अवैधरित्या विपकृत मद्यार्क स्पिरीट काढून विक्रीस नेण्याच्या उद्देशाने काढत असताना अचानकपणे धाड टाकून तीन इसमास अटक करण्यात आली. सदरील कारवाई मध्ये 4 x 250 ली. क्षमतेचे स्पिरीट ने भरलेले प्लास्टिक बॅरल, टँकरमध्ये अंदाजे 30,680 ली. स्पिरीट, एक टाटा कंपनीचा चौदा टायरी टँकर व प्लास्टिक पाईप असा एकूण अंदाजे 35,88,250/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई प्र. अधीक्षक रा.उ.शु.बीड श्री. अभिजित देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. निरीक्षक विजय आगळे, दु.नि. रा.उ.शु.भ.प. बीड हे तपास करीत आहेत. सदर कारवाईत दु.नि. गजानन पवार, अनंता नायबळ, अरुण खाडे, बागवान सोबत जवान, सचिन सांगुळे, भागवत पाटील, राम गोनारे, नितीन मोरे, सुशील ढोले, लोमटे, सादेक यांनी सहकार्य केले.अवैध मद्यविक्री विरोधात कारवाई या पुढे हि चालू राहणार असून, अवैध मद्यबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्री. अभिजित देशमुख प्र. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बीड यांनी सांगून अवैध मद्याबाबत ची माहिती कळवण्याचे आव्हान केले आहे.
