प्रा.पी.टी.चव्हाण यांच्यासह तीस लोकांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेवून गेवराई पीआय पेरगुलवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करा- बी.एम.पवार

Beed

प्रा.पी.टी.चव्हाण यांच्यासह तीस लोकांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेवून गेवराई पीआय पेरगुलवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करा- बी.एम.पवार

वडवणी/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी लढणारे प्रा.पी.टी.चव्हाण आणि त्यांच्या तीस सहकारी समाज बांधवावर खोटे गुन्हे दाखल करणार्‍या गेवराईचे पोलिस निरीक्षक रविंद्रकुमार पेरगुलवार यांच्यावर निलबंनाची कार्यवाही करावी अशी मागणी सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते बी.एम.पवार आणि इतर सहकार्यानी केली आहे.

गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथे ग्रामपंचायतचे मतदान सुरू होते. मतदान केंद्रावरील मतदान पेटीत तांत्रिक अडचणीमुळे वेळ लागत होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा सुरू होत्या. रोखडा या तांड्यातील मतदार मतदानापासून वंचीत राहु नये याची कल्पना संबंधित मतदान अधिकार्‍यांना प्रा.पी.टी.चव्हाण हे देत होते. परंतु राजकीय द्वेशातुन चव्हाण हे प्रचार करीत आहेत असे सांगितले याचा राग मनात धरून गेवराईचे पोलिस निरीक्षक रविंद्रकुमार पेरगुलवार यांनी प्रा.पी.टी.चव्हाण यांना लाठीने मारहाण केली ऐवढ्यावर शांत न राहता लोकावर लाठीचार्ज केला. पोलिस निरीक्षक रविंद्रकुमार पेरगुलवार यांनी कायद्याचा गैरवापर करून चव्हाण आणि संबंधित तीस लोकांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. एखाद्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करावा त्याप्रमाणे गुन्हे दाखल केले असून कायद्याचे रक्षक असलेल्या पोलीस निरीक्षक पेरगुलवार यांनी कायदा हातात घेतला असून पंचवीस वर्षापासून बंजारा समाजाच्या हितासाठी लढणारे प्रा.पी.टी.चव्हाण सर व इतर लोकांवर अन्याय केला आहे. संबंधीतावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा बंजारा समाज बांधव राज्यभर आंदोलन करेल असा इशारा बी.एम.पवार, जीवनभाऊ राठोड, जि.प.सदस्य अ‍ॅड. शरद चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाजीराव राठोड, बाळराजे राठोड, रोहिदास पवार, सर्जेराव जाधव, भुषण पवार, संतोश पवार, विलास राठोड, कृष्णा राठोड, पप्पू राठोड, सनिल चव्हाण, एकनाथ आडे, पवन जाधव यांच्या सह अनेकांनी दिला आहे.

Sharing

Visitor Counter