व्हॉईस ऑफ मीडिया’ची बीड, धारूर तालुक्याची उर्वरित कार्यकारिणी जाहीर

व्हॉईस ऑफ मीडिया’ची बीड, धारूर तालुक्याची उर्वरित कार्यकारिणी जाहीर
बीड/प्रतिनिधी
दि.27 : देशातील वीस मोठ्या संपादकांनी मिळून तयार केलेली व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची बीड, गेवराई आणि धारूर तालुक्यांची उर्वरित कार्यकारिणी राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, संतोष कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली घोषीत करण्यात आली आहे.
यापुर्वीच धारूर तालुक्यात सचिन थोरात यांची अध्यक्ष म्हणून तर अतुल शिनगारे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड जाहीर झालेली होती. तर बीड तालुक्यात अध्यक्ष म्हणून अशोक शिंदे तर कार्याध्यक्ष म्हणून सुरेश रोकडे यांची निवड जाहीर झालेली होती. या दोन्ही तालुक्यातील उर्वरित पदाधिकार्यांची निवड आज घोषीत करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, राज्याध्यक्ष राजा माने हे आहेत. पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीचे प्रश्न, पत्रकारांचे घर, पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाला जुळवून घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण आदींवर ही संघटना प्रामुख्याने काम करणार आहे. देशातील 22 राज्यात या संघटनेचा विस्तार झालेला असून जवळपास 18 हजार पत्रकार या संघटनेशी जोडले गेले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागांपर्यंत या संघटनेचा विस्तार करण्यात येत असून या निवडीबद्दल बीड जिल्हा शाखेचे सरचिटणीस प्रभात बुडूख, कार्यवाहक उदय नागरगोजे, केशव कदम, उपाध्यक्ष अमोल जाधव, भागवत जाधव, जालींदर धांडे, विनोद जिरे, प्रवक्ते गणेश सावंत रांजणीकर, सह सरचिटणीस सुनील यादव, कोषाध्यक्ष अनंत वैद्य, संघटक अनिल जाधव, एजाज शेख, अमोल मुळे, ज्ञानेश्वर वायबसे, प्रसिध्दी प्रमुख शुभम खाडे, सदस्य संजय तिपाले, शिरीष शिंदे, मुकेश झणझणे यांनी अभिनंदन केले आहे.
अशी आहे बीड तालुका कार्यकारिणी
1 अध्यक्ष - अशोक शिंदे, कार्याध्यक्ष - सुरेश रोकडे, उपाध्यक्ष - गणेश जाधव, सरचिटणीस - रामेश्वर जाधव, कार्यवाहक - विकास नाईकवाडे, संघटक - दादासाहेब जोगदंड, प्रसिद्धी प्रमुख - धनंजय जोगडे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशी आहे धारूर तालुका कार्यकारिणी
तालुकाध्यक्ष - सचिन थोरात, कार्याध्यक्ष- अतुल शिनगारे, उपाध्यक्ष - नाथा ढगे, परमेश्वर राऊत, सरचिटणीस- ईश्वर खामकर, सहसरचिटणीस-सूर्यकांत जगताप, खजिनदार/कोषाध्यक्ष - सतीश पोद्दार, कार्यवाहक - अविनाश जगताप, संघटक- रवी गायसमुद्रे, प्रसिद्धी प्रमुख-अतिक मोमीन तर सदस्यपदी सुनील कावळे, संदिपान तोंडे, प्रकाश काळे, इरफान शेख, असलम शेख, हनुमंत बडे, विठ्ठल वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
