राज्य संगणक परिचालक संघटनेच्या लढाईत पुर्णत: ताकदीने उभे राहणार-आ.संदीप क्षीरसागर

राज्य संगणक परिचालक संघटनेच्या लढाईत पुर्णत: ताकदीने उभे राहणार-आ.संदीप क्षीरसागर
नागपुर/प्रतिनिधी
नागपुर येथे सुरू असलेल्या अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या कर्मचार्यांनी आणि पदाधिकार्यांनी आपल्या रास्त मागण्या संदर्भात आज मोर्चा काढला होता. या मोर्चास बीड मतदार संघाचे विकासाभिमुख आ.संदीप क्षीरसागर यांनी भेट देवून कर्मचारी व पदाधिकार्यांकडून मागण्याचे निवेदन स्विकारून या संदर्भात खा.शरदचंद्रजी पवार, कार्यक्षम विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून राज्य संगणक परिचालक संघटनेच्या कर्मचार्यांचे संपुर्ण प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मी या लढाईत पुर्ण ताकदीनिशी उभे राहू असे आश्वासन आ.संदीप क्षीरसागर यांनी या मोर्चातील कर्मचारी, पदाधिकारी यांना दिले.
या बाबतीत अधिक माहिती अशी की,आपले सरकार सेवा केंद्र, प्रकल्पातील संगणक परिचालकांनी मागील अकरा वर्षापासून ग्रामपंचायतस्तरावर संगणक परिचालक म्हणुन प्रामाणिकपणे काम करत आहेत. याचा फायदा ग्रामीण भागातील सुमारे 6 कोटी जनतेला होत असून विविध प्रकारचे सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक अविरतपणे करत असून कोरोना काळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली असून स्वत:च्या जिवाची परवा न करता 19 संगणक परिचालकांनी आपला जीव सुद्धा गमावला आहे. अशा या प्रामाणिकपणे काम करणार्या संगणक परिचालकांना केवळ 7 हजार रूपयांचे तुटपुंजे मानधन मिळते, तेही वेळेवर मिळत नाही या आणि संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित अकृती बंधात पदनिर्मिती करून ग्रामपंचायतस्तरावर कर्मचार्यांचा दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी शासनाकडे अनेक वर्षापासून करत असून याकरिता आज नागपुर अधिवेशनावर महाराष्ट्र संगणक परिचालकांनी मोर्चा काढला. या मोर्चा पाठिंबा देवून अनेक निवेदन स्विकारून, संगणक परिचालक कर्मचार्यांच्या आणि पदाधिकार्यांच्या रास्त मागण्या आपण सभागृहात लक्ष वेधी मांडु असे आश्वासन आ.संदीप क्षीरसागर यांनी दिले.
