बीड जिल्हयात निवडणूकीची आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

Beed

बीड जिल्हयात निवडणूकीची आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

बीड/वार्ताहर 

दि.30:- भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारी 2023 रोजी निवडणुक होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाचे ECI/PN/101/ 2022 दि. 29.12.2022 पत्रातील सूचनानुसार कार्यवाही करण्यात येत असून बीड जिल्हयात निवडणूकीची आचारसंहिता 29 डिसेंबर 2022 पासून तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे अशा सूचना सर्व संबंधितांना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केल्या आहेत.

Sharing

Visitor Counter