वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा येथे विद्यार्थ्यांचे विशेष शिबीरामार्फ़त प्रस्ताव स्विकारुन मार्गदर्शन संपन्न

वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा येथे विद्यार्थ्यांचे विशेष शिबीरामार्फ़त प्रस्ताव स्विकारुन मार्गदर्शन संपन्न
बीड/वार्ताहर
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालय “सामाजिक न्याय पर्व” साजरा करण्यात येत आहे, या अंतर्गत वसंतदादा पाटील महाविद्यालय' पाटोदा ता.पाटोदा येथे जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव स्वीकारण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात बीड जिल्हा जात पडताळणी समितीचे कर्मचारी श्री.सुमितकुमार वाघमारे , श्री.सय्यद आखेब यांनी जात पडताळणी प्रस्ताव स्वीकारून मार्गदर्शन केले.
सदरील आयोजित शिबिरात पाटोदा तालुक्यातील महाविद्यालयातील 67 विध्यार्थी यांचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी पाटोदा तालुक्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य , प्रतिनिधी उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया या सबंधी मार्गदर्शन करण्यात आले. याच बरोबरच विद्यार्थ्यांना जात वैधता बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष शिबीर राबविण्यात येत असुन संबंधित तालुक्यातील महाविद्यालयांनी या विशेष शिबीरामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिपुर्ण प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाकडून कळविण्यात येत आहे.
