दांडी बहादर शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

दांडी बहादर शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप, खोकरमोहाच्या विद्यार्थ्यांनी मांडला ठिया
शिरूर/प्रतिनिधी
तालुक्यातील खोकर मोहा जिल्हा परिषद शाळेत अगोदरच शिक्षक कमी आहेत त्यातच दुपारनंतर अनेक शिक्षक गायब होतात त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते या रोजाच्या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवार दि. 4 जानेवारी रोजी शाळेला कुलूप ठोकत विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडत आम्हाला शिक्षक द्या अशी मागणी केली.
शिरूर तालुक्यातील खोकर मोहा येथील जिल्हा परिषद शाळेत सतत शिक्षक गैरहजर राहत असल्यामुळे अनेक पालकांनी आपले मुलं या शाळेत न टाकता खाजगी शाळेला पसंती दिली, गोरगरिबांचे अनेक मूल याच शाळेत शिक्षणाचे धडे गिरवतात मात्र, या शाळेत शिक्षक कमी असल्यामुळे एका एका शिक्षकावर दोन दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. यातच काही दांडीबहादूर शिक्षक दुपारीच निघून जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या नुकसानीला केवळ आणि जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षण विभागाचा गलथान कारभार जबाबदार आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी शिक्षकांनी गैरहजर राहू नये असे तोंडी सांगितले सरपंचांनी आणि शालेय व्यवस्थापन समितीने ही अनेक वेळा शिक्षकांना वेळेवर शाळेत यावे आणि दिवसभर विद्यार्थ्यांना शिकवावे असे सांगितले मात्र शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याने बुधवार दिनांक 4 जानेवारी रोजी संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आणि विद्यार्थ्यांना घेऊन गावात ठिय्या मांढला, जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही आणि दांडी बहाद्दर शिक्षकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही येथेच बसून राहणार असा आक्रमक पवित्रा शिक्षणप्रेमींसह पालक आणि विद्यार्थ्यांनी घेतला होता त्यानंतर गट विकास अधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मुख्याध्यापक बदलण्याची मागणी
शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये वारंवार खटके उडतात. यामुळे काही शिक्षक दांडी मारतात मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार असलेले मुख्याध्यापक बदलावेत अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे
