धम्माचा प्रचार- प्रसार करण्याकरिता माणसं जोडणे महत्त्वाचे - प्रा. प्रदीप रोडे

धम्माचा प्रचार- प्रसार करण्याकरिता माणसं जोडणे महत्त्वाचे - प्रा. प्रदीप रोडे
बीड/प्रतिनिधी
जगाला शांतीचा समतेचा व मैत्रीचा संदेश देणाऱ्या धम्माचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली स्वीकारला धम्माच्या प्रसार प्रचाराच्या मिशनचे काम श्वासाच्या शेवट पर्यंत करणारे डॉ. भदंत आनंद कौशल्यान यांचे मिशन पुढे न्यावयाचे असेल तर मिशन यशस्वी करता माणसं जोडणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा. प्रदीप रोडे यांनी केले. प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीडच्या वतीने धम्म हॉल शिवणी येथे डॉ.भदंत आनंद कौशल्यान यांच्या 118 वी जयंती दिली विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ते पुढे म्हणाले की कोणतेही सामाजिक,धम्माचेकार्य करीत असताना एकोपा, सौहार्दपूर्ण व पारदर्शता, ठेवून दानपारमितीचे पालन केल्यास यश मिळते. पूज्य डॉ. कौशल्यान यांनी केलेल्या धम्माच्या कार्यावर सखोल प्रकाश टाकून त्यांच्या नावाने उभारलेली नगरी धम्मकार्य, शैक्षणिक कार्याने नावारूपास कशी येईल हे बघणे हेच आनंद कौशल्यान यांना खरे अभिवादन ठरेल.
सैन्य दलात 28 वर्षे सेवा करून देशाच्या सीमेचे संरक्षण करणारे कॅप्टन या पदावरून सेवानिवृत्त झालेले कॅप्टन राजाभाऊ आठवले यांचा जन्म वाढदिवस योगायोगाने ह्याच दिनी असल्याने वते सध्या तन-मन-धनाने करीत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, व समता सैनिक दलाचे मेजर म्हणून करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांचा प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था व वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचायला तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. भदंत कौशल्यान अभिवादन करून डी.जी. वानखेडे म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या" बुद्ध आणि त्यांचा धम्म" या इंग्रजी भाषेतील महान ग्रंथाचे डॉ. भदंत कौशल्यान यांनी हिंदी भाषेत केलेल्या भाषांतरामुळे सर्वसामान्यांना धम्माची ओळख होणे सोपे झाले. पुढे पी.ई. सोसायटीच्या माध्यमातून बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे मराठीत भाषांतर करण्यात आले. कॅप्टन आठवलेना शुभेच्छा देताना ते म्हणाले की कॅप्टन करीत असलेल्या कार्याबद्दल व पुढील आयुष्य करता मंगल कामना व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना कॅप्टन आठवले म्हणाले की पुढील आयुष्य समता सैनिक दलाचे कार्य, महामानव अभिवादन ग्रुप व प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तन-मन-धनाने समाजाचे ऋन फेडण्याचे कार्य करण्याचे ठोस आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.एम भोले यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. भास्करराव सरपते यांनी केले, कार्यक्रमास प्रा. राम गायकवाड, प्रदीप घाडगे, बी.जी. दळवी, काशिनाथ वाघमारे, परमेश्वर विद्यागर रणजीत इंकर ,अक्षय आठवले, शोभा आठवले, वक्तेताई व बहुसंख्य सदस्यांची उपस्थिती होती.
