दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार बांधवांचा भेट वस्तू देऊन सत्कार संपन्न

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार बांधवांचा भेट वस्तू देऊन सत्कार संपन्न
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक आण्णा पोकळे यांच्या वतीने शासकीय विश्रामगृहात आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आष्टी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक आण्णा पोकळे यांच्या कडून भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.पत्रकारिता हे समाजसेवेचे व्रत असून अतिशय प्रामाणिकपणे समाज सेवा करण्याची श्रेष्ठ संधी व भाग्य पत्रकारांना मिळते समाज प्रसारमाध्यमांना आजही अतिशय आदराने पाहतात लोकशाहीला अधिक बळकटी देऊन संस्कारक्षम व सृजनशील समाजनिर्मिती करिता पत्रकारांचा मोलाचा सहभाग असल्याचे मत अशोक आण्णा पोकळे यांनी व्यक्त केले . यावेळी आष्टी तालुक्यातील पत्रकार व चिंचाळयाचे सरपंच पंडित कल्याण पोकळे, सदस्य बाळासाहेब पोकळे उपस्थित होते
