प्रा. गुंडे विठ्ठल बाबुराव यांना पीएच.डी पदवी प्रदान
Beed

प्रा. गुंडे विठ्ठल बाबुराव यांना पीएच.डी पदवी प्रदान
बीड/वार्ताहर
शिरूर का. येथील कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. गुंडे विठ्ठल बाबुराव यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मानव्यविद्या शाखेच्या वतीने इतिहास विषयात पीएच.डी (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वृत्तपत्राचे अध्ययन हा शोध प्रबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे सादर केला होता. या संशोधन कार्यास मार्गदर्शक म्हणून डॉ.व्ही.बी.बोरसे यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल त्यांचे कालिकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. व पुढील संशोधनास शुभेच्छा देण्यात आल्या.
