आसेफ़नगर येथील विकास कामाची माजी नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांनी केली पाहणी

आसेफ़नगर येथील विकास कामाची माजी नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांनी केली पाहणी
अटल अमृत योजनेचे राहिलेले काम काँक्रिटीकरणापूर्वी होणे गरजेचे !
बीड/प्रतिनिधी
शहरातील आसेफ़नगर येथे सुरू असलेले रस्ते व नाल्याच्या कामाची पाहणी माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केली. यावेळी येथील कामाबाबत विचारपूस केली असता येथील ख़ुबा मस्जिद गल्लीमध्ये अटल अमृत योजनेचे राहिलेले काम काँक्रिटीकरणापूर्वी होणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगत हे काम मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण संपण्यापूर्वी होणे आवश्यक असून येथे राहिलेली पाईपलाईन टाकल्यानंतर मुख्य रस्त्यासोबतच ख़ुबा मस्जिद गल्लीचे ही काँक्रिटीकरण करावे लागेल असे त्यांना निदर्शनास आणून दिले. ख़ुबा मस्जिद ची गल्ली जवळपास एक ते दीड फूट खाली गेली आहे म्हणून या गल्लीचे उंचीकरण करणे ही आवश्यक आहेच मात्र तत्पूर्वी गल्ली खांदून येथे टाकायची राहिलेली अटल अमृत योजनेची पाईपलाईन टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर काँक्रिटीकरण करून गल्लीची उंची मुख्य रस्त्यास समतल करावी लागेल असे म्हटले असता त्यांनी ठीक आहे करून घेऊ असे आश्वासन दिले.
तत्पूर्वी माजी नगराध्यक्ष पाहणी करण्याकरिता आल्यानंतर त्यांच्यासमोर विकास कामाबद्दल बोलण्याअगोदर त्यांच्या तब्येतीविषयी आस्थेवाईक विचारपूस केली असता त्यांनी मोकळेपणाने चांगली आहे असे म्हणून तुम्ही कसे आहात असे विचारले.
यावेळी या प्रभागातील ज्येष्ठ माजी नगरसेवक शेख जमील भाई यांच्यासह माजी नगरसेवक गणेश वाघमारे, माजी नगरसेवक मुखीद लाला निंबुवाला, माजी नगरसेवक शेख इक़बाल, अब्दुल क़दिर भाई फाईन, अन्वर खान, शेख मुबीन, शेख शफिक, शेख मोहसीन, इम्तियाज तांबोळी, सय्यद नासिरुद्दीन, शेख वासेख, अब्दुल रऊफ़ भाई, शेख वसीम आणि साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस चे संपादक शेख एजाज़ भाई सह अनेकांची उपस्थिती होती.
