रस्ते सुरक्षा विषयक नियम पालन करण्याची अत्यंत आवश्यकता-  जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

Beed

रस्ते सुरक्षा विषयक नियम पालन करण्याची अत्यंत आवश्यकता-  जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

· राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचा बीड येथे झाला शुभारंभ

बीड/वार्ताहर

दि. ११:-- आपल्या राज्यात मृत्यू होण्याचे सगळ्यात मुख्य कारण हे रस्त्यावरील अपघात आहेत. यामुळे मयत होणाऱ्या व्यक्तीचा खूप कुटुंबास मोठे नुकसान सोसावे लागते. रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करतो आहे. त्याचा मूख्य उद्देश अपघात कमी करायचे हा आहे. आपण सगळ्यांनी रस्ते सुरक्षा विषयक नियम व कायदा पालन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले.

राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 चे उद्घाटनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यापूर्वी जिल्हाधिकारी श्री. शर्मा व अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर व मान्यवरांच्या हस्ते जनजागृती रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. 

 

सदर रॅलीची सुरुवात चंपावती स्कूल, नगर रोड येथून सकाळी ९ : १५ वा झाली. नगर रोड पासून पुढे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय यांच्या समोरच्या रस्त्याने जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे समाप्त झाली. क्रीडांगणाच्या ठिकाणी समारोप कार्यक्रम होऊन सांगता झाली .

 या कार्यक्रमाकरिता जिल्हा न्यायाधीश के. आर. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अजित पवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव न्या. श्रीकांत गोडबोले, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने, चंपावती इंग्लिश स्कूलचे प्राचार्य अरविंद गंधे,आरटीओ सह विविध विभागांचे शासकीय अधिकारी- कर्मचारी, चंपावती इंग्लिश स्कूल व विद्यालयचे शिक्षक आणि विद्यार्थी, जे ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, नागरीक उपस्थित होते.

राज्य रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करतोय, नुसता हा सप्ताह करून उपयोग नाहीये. तर आपण जे काही शिकणार आहोत ते आपल्याला पूर्णपणे आपल्या पूर्ण जीवनामध्ये वापर करायचे आहे. अतिवेगाच्या कारणा मुळे बरेच अपघात होतात. रस्त्यावरती स्पीड लिमिट लिहिलेले आपण तसे वाहन चालवलं पाहिजे. “अति घाई संकटात जाई” हे ते कारण आहे. रस्त्याचे सर्व नियम पाळावे. आपण गाडी जर चालवत असतो, तर ती डाव्या बाजूने चालवायची. परंतु तुम्ही जेव्हा रस्त्याने पायी जाल, तेव्हा उजव्या बाजूने चालावे. चालणाऱ्या व्यक्तींचे अपघात खूप वाढले आहेत, म्हणून नियमात बदल केला आहे. आपण पायी चालत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, हे लक्षात ठेवा. समोर येणाऱ्या वाहनामुळे जर अपघात होत असेल तर त्या व्यक्तीला स्वतःला तरी वाचवता येईल. त्यामुळे हा चालणाऱ्यांसाठी नियमात बदल केला आहे असे न्या. पाटील यांनी सांगितले.

विधी सेवा प्राधिकार्‍यांचे सदस्य सचिव न्या.गोडबोले म्हणाले, सर्व नागरिकांच्या दृष्टीने देशात लागू असलेले कायदे माहिती असणे गरजेचे आहे. त्यामध्ये वाहन विषयक कायदे, रस्ता सुरक्षा विषयक कायदे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. मोटार वाहन कायद्यानुसार 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालवण्याचा परवाना मिळत नाही, ही बाब सगळ्यांनी माहीती करून घेणे गरजेचे आहे व अशा सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. माने म्हणाले, रस्ते अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण देशात सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात आहे. ही बाब चिंताजनक असून यासाठी सर्वांनी रस्ते सुरक्षेतील पंचसूत्री वर अवलंब करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पंचसूत्री पाळण्‍यासाठी प्रेरित करावं, असेही ते यावेळी म्हणाले. बीड जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी अपघाताचे ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही केली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने येत्या काही दिवसभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.

Sharing

Visitor Counter