विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये बीड महसूल विभागाचे चमकदार कामगिरी

विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये बीड महसूल विभागाचे चमकदार कामगिरी
विजेत्यांचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा आणि विविध मान्यवरांकडून अभिनंदन
बीड/वार्ताहर
विभागीय महसूल स्पर्धा औरंगाबाद येथे 8 ते 10 जानेवारी या कालावधीत झाल्या या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये बीड जिल्ह्यातील महसूल विभागातील विविध अधिकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, अपर जिल्हाधिकारी उत्तम पाटील, सहायक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत आणि विविध मान्यवरांकडून अभिनंदन केले आहे.
विशेषता मैदानी स्पर्धांमध्ये खोखो, लांब उडी, पोहणे, बॅडमिंटन, धावणे, रिले, महिलांचे स्पर्धा सांस्कृतिक मध्ये नृत्य प्रकार व सांस्कृतिक मधील कला प्रकारात बीड जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे .शरद झाडके, श्रीकांत हजारे, अशोक मुळे, विजय कणके व कर्णबधिर संघाचे नामदेव खेडकर महिला संघातील वर्षा मनाळे , स्मिता गुंजाळ, पुनम मिसाळ, मोनिका बसू , शितल मरकाडे, सोनाली गायकवाड व सांस्कृतिक कला प्रकारातील गणेश सरोदे व संघाचा उत्कृष्ट कामगिरी मध्ये सहभाग राहिला आहे.
