बिंदुसरेच्या संवर्धनासाठी सीओ नीता अंधारे यांच्या आवाहनाला सामाजिक कार्यकर्त्याकडुन प्रतिसाद

बिंदुसरेच्या संवर्धनासाठी सीओ नीता अंधारे यांच्या आवाहनाला सामाजिक कार्यकर्त्याकडुन प्रतिसाद
बीड/वार्ताहर
बीड शहरातील बिंदुसरा नदीचे पुर्ण पात्र स्वच्छ होण्यासाठी राबविण्यात येणा-या मोहिमेत लोकसहभाग असणे गरजेचं असुन त्यांनी पुढाकार घ्यावा या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते यांनी आज दि.१३ जानेवारी शुक्रवार रोजी मुख्याधिकारी नीता अंधारे यांची भेट घेऊन मोहिमेत सहभागी होऊन यथाशक्ति मदत करण्याचे आश्वासन देत नीता अंधारे यांचे अभिनंदन केले
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,रामनाथ खोड,अड. संगीता धसे,संजीवनी राऊत,शेख युनुस, आप जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे,शहराध्यक्ष सादेक सय्यद , भिमराव कुटे आदि उपस्थित होते.
दि.७ जानेवारी शनिवार रोजी शहराच्या मधोमध वाहणा-या बिंदुसरा नदीच्या स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांनी नगरपरिषद आधिकारी कर्मचा-सह २०० कर्मचारी,२० ट्रॅक्टर आणि २ जेसीबी या यंत्रणेसह करतानाच जिल्हाधिकारी व मुख्याधीकारी यांनी या स्वच्छता मोहिमेत नागरीक व स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे सगळ्यांच्या लोकसहभागातूनच ही मोहीम पूर्णत्वास जाऊ शकते असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांची भेट घेतली.
सामाजिक संघटनांच्या जेसीबी मशिनींना इंधन पुरवण्याची मागणी:- डाॅ.गणेश ढवळे
सामाजिक संघटनांनी बिंदुसरानदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच नदीपात्रातील अस्वचछ्ता दुर करण्यासाठी सामाजिक संघटना विनामूल्य जेसीबी यंत्रणा उपलब्ध करून देत असुन त्यांच्या इंधनाची सोय नगरपरिषद बीड यांच्यामार्फत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी नीता अंधारे यांनी मागणी मान्य करत इंधन खर्च देण्याचे मान्य केले तसेच आणखी मदतीसाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या समवेत चर्चा करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बिंदुसरा स्वच्छता मोहिमेत आम आदमी पार्टी सहभागी:- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आप
आम आदमी पार्टी मागील २ वर्षापासुन बिंदुसरा नदीपात्रातील अतिक्रमण तसेच अस्वच्छते विषयी निवेदन तसेच आंदोलनाद्वारे लक्ष वेधले असुन जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांनी बिंदुसरा नदी संवर्धनासाठी स्वच्छतेसाठी हाती घेतलेल्या मोहीमेत आम आदमी पार्टी सहभागी सहभागी होणार आहे.
