मतदान प्रक्रिया शांततेत निर्भय वातावणात पार पाडण्यासाठी

Beed

मतदान प्रक्रिया शांततेत निर्भय वातावणात पार पाडण्यासाठी

जिल्हयातील 34 मतदान केंद्राच्या परिसरात कलम 144 (2) नुसार प्रतिबंध जारी

बीड/वार्ताहर 

जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक- 2023 जाहीर झाली असून आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. भारत निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हयातील 34 मतदान केंद्रावर 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत निर्भय वातावणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता जिल्हादंडाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे 1973 चे कलम 144 (2) मधील शक्तीचा वापर करुन सदर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

 

                    जिल्ह्यातील 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठीच्या सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन ,पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन तसेच खाजगी वाहन वापरावर आणि प्रतिबंध घालण्यात आले आहेत. निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी व वाहने यांना वगळून लागू हे प्रतिबंध लागू राहतील. निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तिस या परिसरातील प्रवेश करण्याकरीता प्रतिबंध करण्यात आला आहे.

निवडणूक शातंतेने व खुल्या वातावरणात पार पाडावी. कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनामार्फत या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तसेच या आदेशानुसार खालीलप्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्र परिसरात 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणे प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु जे मतदार मतदानासाठी रांगेत संबंधित मतदान केंद्रावर उभे आहेत. त्यांना हा आदेश लागू राहणार नाही. मतदान केंद्राच्या परिसरात ध्वनीक्षेपक वाजवणे, वाद्य वाजवणे, मिरवणूका काढणे यावर प्रतिबंध करण्यात येत आहे. शासकीय वाहना व्यतिरीक्त इतर अनधिकृत वाहनांना 200 मिटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

सदर आदेश निवडणूकीच्या कामाकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना वगळून लागू राहतील. हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, मयताचे अंत्ययात्रेसाठी लागू राहणार नाही असे निर्देश देण्यात आले आहेत.

Sharing

Visitor Counter