चांदणी चौकात चार दुकानाला आग लागून लाखोंचा नुकसान !

Beed

चांदणी चौकात चार दुकानाला आग लागून लाखोंचा नुकसान !

बीड प्रतिनिधी

चांदणी चौकात असलेल्या किरकोळ पेट्रोल डिझेल विक्रेत्याच्या दुकानाला भिषण आग लागून बाजूची टपरी व स्वस्त धान्य दुकान देखील जळून खाक झाल्याची घटना आज संध्याकाळी अकरा वाजता घडली असून आग विझविण्यासाठी अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आग अजूनही आटोक्यात आलेली नसून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अग्निशामक पथक कडून एकच गाडी आग विझविण्यासाठी घटनास्थळी असून ती ये जा करत असल्याने आग आटोक्यात येऊन ही अजून वाढत आहे. यामुळे दुर्दैव नक्की कुणाचा अग्निशमन पथक की या जळालेल्या दुकानदारांचा? हे म्हणण्याची वेळ आली आहे.अशी माहिती प्राथमिक स्वरूपाची सूत्रांकडून मिळाली आहे

Sharing

Visitor Counter