अवकाळी वाऱ्यांसह पावसाचा बीड शहरावर कहर; पोलिसांची नवीन इमारत झाली नुकसानग्रस्त

Beed

अवकाळी वाऱ्यांसह पावसाचा बीड शहरावर कहर; पोलिसांची नवीन इमारत झाली नुकसानग्रस्त

बीड प्रतिनिधी 

अवकाळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसाने सोमवारी बीड शहराला चांगलेच झोडपले. या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली, तर काही भागात वीज पुरवठाही खंडित झाला. विशेष म्हणजे, नुकतीच बांधण्यात आलेली पोलिसांची नवीन इमारतही या वाऱ्याचा फटका सहन करू शकली नाही.या इमारतीतील खिडक्यांच्या काचा फुटल्या असून, काही भागांमध्ये इमारत कोसळल्यासारखे दृश्य पाहायला मिळाले. याशिवाय, पोलिस पेट्रोल पंपाचे छप्परही वाऱ्याने उडवले. या घटनेमुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. पोलिसांसाठी नवीन इमारत अवघ्या एका वर्षात बांधण्यात आली असून एवढ्या लवकर ती अशी खराब स्थितीत आल्यामुळे संबंधित गुत्तेदाराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.पोलीस अधीक्षकांनी तात्काळ भेट दिली असून, संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे.

Sharing

Visitor Counter