बीडमध्ये बससेवा ठप्प; चालकाकडून 'बंदची' हाक; प्रवाशांचे मात्र हाल

बीडमध्ये बससेवा ठप्प; चालकाकडून 'बंदची' हाक; प्रवाशांचे मात्र हाल
बीड प्रतिनिधी
शहरात आज दुपारी चार वाजता घडलेल्या अनपेक्षित घटनेनंतर बीडमधील बससेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. बस चालकाने ‘बंदची’ हाक दिल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीत मोठा गोंधळ निर्माण झाला असून, नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका बस चालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बंदची हाक दिल्याने जागोजागी बस थांबलेल्या दिसत आहेत. परिणामी प्रवासी रस्त्यावर अडकून पडले आहेत. शाळकरी मुले, महिला, कार्यालयीन कर्मचारी तसेच ग्रामीण भागातून येणारे नागरिक बस न मिळाल्यामुळे रस्त्यांवर ताटकळताना दिसत आहेत.
घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याआधीच बंद च्या स्वरूपात बससेवा पूर्णतः बंद झाल्याने बीडकरांचे मोठे हाल सुरू आहेत.यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेले नसले तरी, ही घटना प्रशासनासाठीही चिंतेची बाब ठरत आहे. नागरिकांनी लवकरात लवकर बससेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.