बीड नगर परिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांची बदली, शैलेश फडसे यांची नवीन नियुक्ती
Beed

बीड नगर परिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांची बदली, शैलेश फडसे यांची नवीन नियुक्ती
बीड प्रतिनिधी
नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या अंधारे यांची बदली बीडकरांसाठी मोठी घडामोड मानली जात आहे.
त्यांच्या जागी आता शैलेश फडसे हे नवे मुख्याधिकारी म्हणून बीडमध्ये कार्यभार स्वीकारणार आहेत. फडसे यांची बदली मुदखेड तालुका, जिल्हा नांदेड येथून बीड येथे करण्यात आली आहे.
या बदल्या आगामी नगर परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नवीन मुख्याधिकाऱ्यांकडून बीडकरांना सकारात्मक बदलांची अपेक्षा आहे.
