धारूर आडस रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य वाहनचालक वैतागले निवीदा निघून हि काम रखडले बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार

धारूर आडस रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य वाहनचालक वैतागले निवीदा निघून हि काम रखडले बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार
धारूर/प्रतिनिधी
धारूर ते आडस या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून वाहनचालकाना अनेक अडचणीचा सामना करत वाहने चालवावी लागत आहे या रस्त्यावरील खड्डे बुजवणे आवश्यक असताना सार्वजनीक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असून या रस्त्याचे 16 कि.मी.चे निवीदा निघाली असून कोरोना आपत्ती मुळे काम रखडल्याचे सांगून उडवा उडवी करत आहेत .नागरीक माञ या लहरी कारभारा मुळे वैतागून गेले आहेत.
धारूर आडस रस्ता हा अंबाजोगाई व लातूर जाण्या येण्या साठु प्रमूख मार्ग झाल्याने वाहतूक वाढली आहे वाहणाची संख्या वाढली आहे .माञ धारूर ते आडस या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्या वर खड्डाचे साम्राज्य झाले असून वाहणधारकाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.या रस्त्याची हि आवस्था गेल्या एक वर्षा पासून असून वाहणधारक वैतागून गेले आहेत व रस्त्या वरील खड्ड्या मुळे रस्त्याची चाळणी झाली आहे.वार्षीक देखभाल दुरूस्ती मध्ये नोव्होबंर 2019 मध्ये या रस्त्यावरील खड्डे बूजवण्याची निवीदा निघाली माञ पुढे खड्डे बूजवण्यात आले नाहीत त्यमुळे हे काम कागदावरच तर झाले नाही आशी शंका व्यक्त केली जात असून सां बा विभागाचे कारभाराला प्रवाशी व वाहणधारक माञ वैतागूण गेले आहेत ,या रस्त्यावरील अपघात व प्रवाशाची गैरसोय थांबवण्या साठी तात्काळ खड्डे बुजवून रस्ता व्यवस्थीत करावा आशी मागणी बंडोबा सांवत शाहूराव चव्हान यांनी केली आहे.
सोळा किंमीचे काम होणार कोरोना मुळे प्रलंबीतकार्यकारी अभियंता एन टि पाटीलधारूर ते अंबाजोगाई रस्त्याचे धारूर पासून पुढे सोळा कि.मी डांबरीकरणाचे निवीदा प्रक्रीया चार कोटी रुपयाची निघाली आहे प्रक्रीय पुर्ण झाली आहे माञ कोरोना आपत्ती मुळे काम थांवण्यात आले आहे आशी माहीती सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता एन टि पाटील यांनी सांगीतले .