स्वच्छतेकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष-अतिक मोमीन

स्वच्छतेकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष-अतिक मोमीन
किल्लेधारूर/रवी गायसमुद्रे
सध्या कोरोना विषाणूचा परादुर्भाव पाहता शहरात ठिकठिकाणी पावसाचा पाणी साचत आहे व नाल्या न काढल्यामुळे शहरातील वातावरण दुषित झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाळयाच्या दिवसांतही नगरपरिषदेने कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून शहराच्या अनेक भागात स्वच्छतेचे तिनतेरा वाजले आहेत.
शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. पालिकेव्दारा नागरिकांकडून नियमितपणे करवसुली केली जाते.परंतू सुरळीतपणे सेवा मिळत नसल्याने नगरपालीका अपयशी ठरल्याचे दिसून येते. पावसाळयाच्या दिवसांतही काही भागात नाल्याचे पाणी रोड वरून थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे.शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना दुगंर्धीचा त्रास होत आहे..त्यामुळे स्वच्छतेच्या समस्येकडे पालिकेच्या मुखधिकाऱ्यांनी स्वतःलक्ष द्यावे अशी मागणी विश्व मानव अधिकार परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष अतीक मोमीन यांनी या प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.
