शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत चना खरेदीस १५ जुलै पर्यंत मुदतवाढ

शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत चना खरेदीस १५ जुलै पर्यंत मुदतवाढ
बीड/प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजना (Price Support Scheme) अंतर्गत बीड जिल्ह्यात फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया (FCI)च्या वतीने चना खरेदी चालु आहे. सदरची खरेदी जिल्ह्यात (FCI)चे सब एजंट संस्था म्हणुन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचे वतीने एकुण १३ सहकारी संस्था मार्फत १३ खरेदी केंद्रावर चालु आहे.
सदर योजने अंतर्गत राज्यात चना खरेदीस केंद्र शासनामार्फत मुदतवाढ देण्यात आलेली असुन,दि.१५जुलै २०२० पर्यत सदरची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी NEML पोर्टलवर आपली ऑनलाईन नाव नोंदणी केलेली आहे, अशा शेतकन्यांनी ज्या खरेदी केंद्रावर नांव नोंदणी केलेली आहे त्या खरेदी केंद्रावरुन शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेल्या संदेश (मेसेज ) प्रमाणे दिलेल्या तारखेस आपला शेतमाल विक्रीस घेऊन जावा असे आवाहन शिवाजी बढे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले
आहे.