धारूरकरांच्या माणुसकीने मध्यप्रदेश मधील कामगार मजूर झाले भाऊक

धारूरकरांच्या माणुसकीने मध्यप्रदेश मधील कामगार मजूर झाले भाऊक
रात्री ११:०० वाजता तीन बसमधून ५१ मजूर धुळ्याकडे रवाना
किल्ले धारूर/इरफान शेख
धारूर येथील गुरु राघवेंद्र जिनींग वर काम करणारे ३६ मजूर व १५ बालके सोमिवारी दुपारी मध्याप्रदेश मधील त्यांच्या गावाकडे पायी निघाले होते यात १० दिवसाचा एक बालक व त्याची माता देखील पायी उन्हात चालत जात होते त्यांना पोलीस निरीक्षक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी थांबवून शिवभोजन केंद्रातून जेवणाचा आधार दिला.
पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी सर्वांना बिस्किटे देवून तहसिलदार वंदना शिडोळकर यांचाशी संपर्क साधून प्रशासनाकडून या मजुरांसाठी बसची सोय करण्याची मागणी केली या कामात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी प्रशासनास मोलाचे सहकार्य केले.
प्रशासकीय बाबी पूर्ण करून जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने डेपो मॅनेजर शंकर स्वामी यानी तीन बस सहा चालकासह उपलब्ध करून दिल्या सकाळ पासूनच उपाशी असणाऱ्या मजुरांना धारूर कराणी माणुसकी दाखवत दहावी १९९७ बॅचने संध्याकाळी खिचडी,लोणचे याची सोय केली राजकीय नेते, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी जिनींग मालकास खडे बोल सूनवून मजुरांना त्यांचे मानधन मिळवून दिले सामाजिक कार्यायात योगदान देत गटनेत्यांनी पाच डझन बिस्कीट सर्वांना वाटप केले कुठलेही नाते गोते नसतानाही धारूर करांची एव्हडी आपुलकी पाहून एका प्रकारे माणुसकीचे दर्शनच घडले आहे.
रात्री अकरा वाजता तहसिलदार वंदना शिडोळकर, पोलीस धस मॅडम यांनी चालकांचे स्वागत करून धुळ्या जिल्ह्यातील शहापूर कडील प्रवासाठी शुभेच्छा दिल्या या वेळी सर्व मजूर धारूर करांची माणुसकी पाहून भारावून गेले होते दहा दिवसाच्या बालकाच्या मातेने धारूर वाशियांचे आभार मानले तर काही मजूर म्हणाले आज तुमच्या रुपात आम्हाला देवच भेटले आज सकाळी ९ वाजता सर्व कामगार मजूर धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याची सीमा शहापूर येथे पोहचल्याने चालक फुटाणे यांनी सांगितले.








