बीड शहरात १६ युरीन ब्लॉक उभारले जाणार!

Beed

बीड शहरात १६ युरीन ब्लॉक उभारले जाणार!

उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन

बीड/प्रतिनिधी

शहरातील विविध ठिकाणी १६ सार्वजनिक युरीन ब्लॉक उभारले जाणार असून पेठ बीड भागातील बाजार तळावर आणि बालाजी मंदिरासमोरील चमण या ठिकाणी युरीन ब्लॉक मुतारी कामाचे भुमिपुजन उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
बीड शहरातील विविध १६ ठिकाणी नगर पालिकेच्या १४ व्या वित्त आयोगातून सार्वजनिक युुरीब ब्लॉक मुतारी बांधकाम करण्यात येणार आहेत. शहरातील नागरीकांच्या सोयी करीता सार्वजनिक ठिकाणी सदरील युरीन ब्लॉक बांधले जाणार आहेत. शहराच्या विविध भागात युरीन ब्लॉक उभारले जाणार असून पेठ बीड भागातील बाजार तळ आणि बालाजी मंदिरासमोरील चमण या ठिकाणी युरीन ब्लॉक मुतारी बांधकामाचे भुमिपुजन आज उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या भागातील नगरसेवक सम्राट चव्हाण, पिंटू पवार, शेख आमेर आण्णा, संजय घेणे, मंत्री काका, चरखा साहेब, अबुभाई, दिलीप ढेपे, अशोक कोतवाल, परदेशी त्याचबरोबर न.प.चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter