पिककर्ज देण्यास टाळाटाळ कराल तर,गाठ शिवसेनेशी

पिककर्ज देण्यास टाळाटाळ कराल तर,गाठ शिवसेनेशी
धारुर/प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी बँकेत चकरा मारत आहेत,मात्र काही मुजोर आधीकारी शेतकऱ्यांना तांत्रिक चुका काढुन शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यापासुन वंचित ठेवत असल्याच्या तक्रारी शिवसेना पदाधीकारी यांच्या कडे आल्या होत्या,त्यासाठी आज शिवसेना तालुका प्रमुख नारायण कुरुंद यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदासह तहसीलदार यांना निवेदन देऊन समक्श बँक मँनेजर यांना समोर बोलावुन तहसीलदार यांच्या समोर कानउघडणी करुन शेतकऱ्याचे पीककर्ज प्रकरण तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले,१) शेतकऱ्यांना तांत्रिक आडचणी न दाखवता तात्काळ पीककर्ज द्या.२)पीककर्ज मागणीचा अर्ज मराठी मध्ये उपलब्ध करावा,पहीले कर्ज न बाघता शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज द्या.४)शंभर रुपयाचे स्टँप फक्त एकच घेण्यात यावा.शेतकऱ्यांच्या खात्याला लावण्यात आलेला व्होल्ट तात्काळ काढावा. इतर मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देऊन तात्काळ कारवाई करावी नसता सदरील बँकेच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल आसा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला यावेळी तालुका प्रमुख नारायण कुरुंद,शहर प्रमुख राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख महेश भैया आलाट, बंडु शिनगारे,उपतालुका प्रमुख बंडु बाप्पा सावंत,दत्ताभाऊ थोरात,उपशहर प्रमुख नितीन भैया सद्दीवाल विध्यार्थी सेना तालुका प्रमुख गणेश पवार,युवा सेना शहर प्रमुख शरद उबाळे सह शेतकरी शिवसैनिक उपस्थित होते.