अंबाजोगाई शहरातील संतकबीरनगर च्या काही भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Beed

अंबाजोगाई शहरातील संतकबीरनगर च्या काही भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड/प्रतिनिधी

अंबाजोगाई शहरातील संत कबीर नगर येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आल्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .

अंबाजोगाई शहरातील संत कबीर नगर येथील व्यक्ती कोरोना बाधित झाले असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अंबाजोगाई शहरातील संत कबीर नगर मधील कृष्णाबाई धारोबा बनसोडे यांचे घर ते नानासाहेब विठ्ठल कांबळे यांच्या घरापर्यंत चा परिसर येथे कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Sharing

Visitor Counter