सरकारच्या मोफत धान्य वाटप योजनेपासून आष्टी शहरातील वंचित १०१ कुटुंबांना मनसेच्या वतीने धान्य वाटप-मनसे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर

सरकारच्या मोफत धान्य वाटप योजनेपासून आष्टी शहरातील वंचित १०१ कुटुंबांना मनसेच्या वतीने धान्य वाटप-मनसे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
सरकारने कोरोना काळात जनतेला सरसकट मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती.परतुं वास्तविक ठराविक काही कुटुंबांना धान्य मिळाले परंतु बहुतांश लोक या योजनेपासून आजही वंचित राहीलेले आहेत यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आष्टीशहरातील वंचित १०१कुटुबांना मनसेच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले आहे यावेळी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर आष्टीशहरध्यक्ष महेश अनारसे, शिरूर तालुका अध्यक्ष सोपानराव मोरे, पाटोदा तालुकाध्यक्ष नागेश पाटोळे,आष्टी तालुका अध्यक्ष भाऊ मेटे,पराग बेदरे,संपत सायकड, मच्छिंद्र गरजे,लहू भवर, किशोर डोमकावळे, रोहीत सायकड,रवि माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.