शहर विकासाच्या नावाखाली दहशत निर्माण करुन व्यापारपेठ पाडुून शहर उद्धवस्त केले - आ.बाळासाहेब आजबे

शहर विकासाच्या नावाखाली दहशत निर्माण करुन
व्यापारपेठ पाडुून शहर उद्धवस्त केले - आ.बाळासाहेब आजबे
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी नगरपंचायत च्या माध्यमातून आष्टी शहर विकास कामांची मोठी यादी तयार करून शहरात येणाऱ्या चारीही बाजुचे रस्ते एकाच वेळी खोदून रहदारीला मोठा अडथळा निर्माण केला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शनि चौकातील मुख्य पुल पाडल्याने नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न नगरपंचायत करीत असल्याने या सर्व नियोजनात अभाव असल्याने आमच्या याला विरोध आहे. आमचा विकासाला नव्हे तर होत असलेल्या चुकीच्या कामाला विरोध असल्याचे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना आ.आजबे म्हणाले आष्टी शहराला सांस्कृतिक ,धार्मिक, ऐतिहासिक वारसा आहे .आष्टी शहरांमध्ये ऐतिहासिक कमान वेस ,मोठा तलाव पिंपळेश्वर देवस्थान मंदिर, दर्गा अशी ठिकाणे आहेय.या ठिकाणाला हात लावू नये. त्याचबरोबर अहमदनगर ,औरंगाबाद या शहरांमध्ये इतिहास कालीन निजामकालीन कमान वेस आहेत अहमदनगर मध्ये दिल्लीगेट आहे तसेच शहरामध्ये रस्ते छोटी-छोटी आहेत त्या प्रमाणात आष्टी शहर खूप छोटे असून शहरांमध्ये पन्नास-पंचावन्न फुटाची रस्त्याची काय गरज आहे ?नगर बीड रस्ता हा 30 फुटाचा आणि आष्टी शहरातील रस्ते 55 फुटाची नेमका कोणता विकास सुरू आहे असे सांगून आष्टी शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे अतिक्रमणे काढून घेण्यास भाग पाडले. त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे हे चुकीचं आहे .अगोदर या व्यावसायिकांचे अतिक्रमण पाडण्याअगोदर यांना पर्यायी जागा देऊन त्यांचे व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केल्यानंतरच त्यांचे हे अतिक्रमण काढायला पाहिजे होते. तसेच आज शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवल्याने रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. एक रस्ता पूर्ण केल्यानंतरच दुसरा रस्ता खोदायला पाहिजे होता तसे न करता हे चुकीच्या पद्धतीने कामे सुरू आहेत. पावसाळा सुरू झाला आणि शहराला जोडणारा महत्त्वाचा पुुल तोडण्यात आला त्यामुळे व्यापारी पेठेत व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. आज झाडे लावण्याच्या नावाखाली धार्मिक स्थळे, मशानभुमी ,दर्ग्याच्या जागा ,शासकीय जागा हा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. आष्टी शहराची पूर्वीची शहर रचना अतिशय सुंदर असून सर्व शासकीय कार्यालय सुसज्ज अशा भव्य जागेत एकमेकाला लढत होती आणि तीच कार्यालय त्याच ठिकाणी योग्य आहेत .तहसील कार्यालय शहराबाहेर गेल्याने शहरातील आणि ग्रामीण भागातील जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. यापुढे एकही कार्यालय आहे त्या जागेतून दुसरीकडे हलवण्यात येऊ नये . शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे काढलेले अतिक्रमण विषयी बोलताना बाळासाहेब आजबे यांनी अशी माहिती दिली की ही अतिक्रमणे नगरपंचायतीने एकही काढली नाहीत.तर ही अतिक्रमणे काढली कुणी असा प्रश्न समोर आला आहे. अतिक्रमण काढण्यासाठी दहशत निर्माण केली असून या दहशतीच्या विरोधात आम्ही खंबीरपणे उभा आहोत.नागरिकांनी व्यापाऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि यापुढे शहरातील अतिक्रमण काढायचे असेल तर रीतसर नोटीस देऊनच अतिक्रमण काढण्यात यावे लोकांना नागरिकांना विचारात घेऊन अतिक्रमण काढले पाहिजेत .आष्टी शहरातील श्रद्धास्थान असलेले शनी मंदिर ,चंद्रवाली दर्गा असा धार्मिक स्थळांना अजिबात धक्का लावू नये. हे जे आष्टीमध्ये चाललेले आहे ते नियोजन शून्य काम आहे. नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. चुकीच्या मार्गाने चाललेल्या कामामुळे लहान मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे .अशा या चुकीच्या नियोजन कामाला आमचा विरोध आहे. आष्टी शहराचा विकास झालाच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत परंतु होत असलेल्या नियोजन अभावामुळे जनतेचे हाल हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही .यासाठी आम्ही लवकरच निर्णय घेत असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले .यापुढे शहरातील कोणतेही अतिक्रमण व अतिक्रमण धारकांनी ही आपल्याला रिसर नगरपंचायत ची नोटीस आल्याशिवाय अतिक्रमण काढू नयेत असे बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.