सुरक्षा समितीची धारूर मध्ये आॕनलाईन बैठक विवीध विषयावर चर्चा

सुरक्षा समितीची धारूर मध्ये आॕनलाईन बैठक विवीध विषयावर चर्चा
धारूर (प्रतिनिधी)
शहरात कोरोना चा प्रादूर्भाव रोकण्या साठी प्रभाग निहाय सुरक्षा समित्या तयार करण्यात आल्या असून यांना मार्गदर्शन करण्या साठी आॕनलाईन बैठक घेण्यात आली व विवीध विषया वर चर्चा करून समितीचे कामकाजा बद्दल व शहरातील समस्या बाबत चर्चा करण्यात आली या बैठकीत सर्व अधिकारी व समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
कोरोना चा प्रादूर्भाव रोकण्या साठी शहरात प्रभाग निहाय सुरक्षा समित्या तयार करण्यात आल्या असून या समित्या प्रभाग निहाय चांगले काम करत आहेत या समित्यान मार्गदर्शन करण्या साठी आॕनलाईन बैठक घेण्यात आली .या बैठकीला मार्गदर्शन करण्या साठी तालूका आरोग्य आधिकारी डाॕ सचिन शेकडे ग्रामीण रुग्नालयाचे अधिक्षक डाॕ चेतन आदमाने नायब तहसीलदार सुहास हजारे मुख्याधीकारी नितिन बागूल, यांनी सर्व सहभागीना मार्गदर्शन केले या समिती चे कार्याची माहीती सांगून येणाऱ्या काळात कुठल्या दक्षता घेतल्या पाहीजेत यांचे मार्गदर्शन करून .समिती अध्यक्ष व सदस्याच्या सुचना ऐकून घेतल्या यावेळी अनिल महाजन सुधिर शिनगारे नितीन शुक्ला अतूल शिनगारे ईश्वर खामकर आदी सहभागी झाले होते त्यांनी सुचना केल्या. शहरात भाजीपाला विक्रीची मोठी समस्या आहे ति ही दुर केली पाहीजे शहरातील नागरीकाची अडचन दुर होईल .या बैठकीत होम क्वांराटाईन असणाऱ्या व्यक्तीनी कुठली दक्षता घ्यावी या बाबत चर्चा होऊन सुरक्षा.समितीने जनजागृती करावी व नियमाचे पालन करायला लावावे असे सुचवण्यात आले. या बैठकीला समिती अध्यक्ष , सदस्य व अधिकारी सहभागी झाले








