आर बी अट्टल महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशासाठी सुवर्णसंधी

Beed

आर बी अट्टल महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशासाठी सुवर्णसंधी 

गेवराई/प्रतिनिधी

येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आर .बी. अट्टल महाविद्यालय यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज व शुल्क वेबसाईटवरुन भरण्याची सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे आर. बी .अट्टल महाविद्यालय हे  सुवर्णमहोत्सवी वर्षात  पदार्पण करत असून  महाविद्यालयाने  विविध क्षेत्रात  उत्तुंग भरारी घेतली आहे.  तज्ञ प्राध्यापक,  सुसज्ज ग्रंथालय , भव्य क्रीडांगण , अद्यावत वनस्पती उद्यान , जिम, बॅडमिंटन हॉल, इनडोअर व आऊटडोअर सुविधा, मुलींसाठी  सर्व सोयींनी युक्त सुरक्षित वसतिगृह, शैक्षणिकदृष्टया प्राध्यापकांचे वैयक्तिक लक्ष  ,स्पर्धात्मक परीक्षेची तयारी, जॉब प्लेसमेंटसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न,  कला-क्रीडा ,नाट्य, वक्तृत्व , अभिनय आदी क्षेत्रात  महाविद्यालयाचा नावलौकिक आहे , इतर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी  महाविद्यालयाचे नाव ऐकून  या महाविद्यालयात प्रवेश घेत असतात . विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास  साध्य करण्यासाठी  महाविद्यालय कार्यतत्पर असते . महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ  आणि प्रशासन  यांच्या समन्वयातून  महाविद्यालय  प्रगतिपथावर आहे  .महाविद्यालय  नॅक पूर्नमूल्यांकन प्राप्त  आणि  आय.एस.ओ.मानांकितआहे . सध्या कोविड १९ विषाणूचा कहर सुरू असल्यामुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची काळजी म्हणून  सन 2020 -2021 या शैक्षणिक वर्षात सर्व वर्गांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे महाविद्यालयातून १२ वी. उत्तीर्ण ज्या विद्यार्थ्यांना टी.सी .काढावयाचा आहे त्यांनी महाविद्यालयाच्या (rbattalcollege.in) या संकेतस्थळावर ( वेबसाईटवर ) जाऊन ऑनलाइन फॉर्म व फी भरावी .मागील वर्षी वरिष्ठ महाविद्यालयाचे  बी.ए .,बी.कॉम .,बी .एस्सी., एम.कॉम., एम.एस्सी चे जे विद्यार्थी द्वितीय व तृतीय वर्ष  वर्गाचे  प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी आपले प्रवेश ऑनलाईन पूर्ण करावेत. .बी.ए., बी. कॉम., बी. एस्सी ., एम.एस्सी , एम.कॉम प्रथम वर्ष वर्गात प्रवेश घ्यावयाचा असल्यास विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरावा. इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी विज्ञान वर्ग प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांनी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करावी. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरच त्यांचे प्रवेश पूर्ण केले जातील . मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी विज्ञान ,वाणिज्य व कला या वर्गात प्रवेश घेतलेला होता त्यांनी १२ वी प्रवेशासाठी  ऑनलाईन शुल्क भरून प्रवेश पूर्ण करावेत. तसेच अकरावी कला व वाणिज्य वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी दिनांक ०७ ऑगस्टपासून महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन शारीरिक अंतर ठेवून, तोंडाला मास्क लावून सॅनिटायजर सोबत ठेवून यावे आणि गर्दी टाळून आपले प्रवेश पूर्ण करावेत.  ऑनलाईन प्रवेशाबाबत  काही शंका किंवा अडचणी असतील तर  ११ वी. व १२ वी. च्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अशोक जगताप (9421349397) व डॉ. राजेंद्र गोडबोले (9403987167)  या संपर्क क्रमांकावर आणि वरिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशासंदर्भात सागडे किसन (9421349699) व  मस्के अभिलाष (9527549654) या क्रमांकावर संपर्क साधून प्रवेशाबाबत अधिक माहिती घ्यावी व प्रवेश पूर्ण करावेत,असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter