जयभवानी मा.व उच्च माध्यमिक महाविद्यालय गढी ता.गेवराई येथे मंडणगड पॅटर्न अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र वाटप संपन्न

जयभवानी मा.व उच्च माध्यमिक महाविद्यालय गढी ता.गेवराई येथे मंडणगड पॅटर्न अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र वाटप संपन्न
बीड/वार्ताहर
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालय तर्फे मंडनगड पॅटर्न राबविण्या साठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे,
या अंतर्गत जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय' गढी ता.गेवराई जि. बीड येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात जात पडताळणी कार्यालयाच्या उपायुक्त श्रीमती.मकरंद मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे श्री.शेवाळे सर,मुंढे सर,जाधव सर,अडागळे सर,दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी सावंत सर बीड जिल्हा जात पडताळणी समितीचे कर्मचारी श्री.सय्यद आखेब,श्री.मधुसूदन मस्के ,विध्यार्थी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.
जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष शिबीर राबविण्यात येत असुन संबंधित तालुक्यातील महाविद्यालयांनी या विशेष शिबीरामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिपुर्ण प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाकडून कळविण्यात येत आहे.








