छत्रपती पब्लिक इंग्लिश स्कूल वडवणी येथे राजमाता जिजाऊ आई साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

छत्रपती पब्लिक इंग्लिश स्कूल वडवणी येथे राजमाता जिजाऊ आई साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
वडवणी/प्रतिनिधी
वडवणी येथे छत्रपती पब्लिक इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या सचिव सौ गीतांजली मस्के,व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरे मॅडम यांनी केले. तर प्रमुख पाहुणे लाभलेले गीतांजली मस्के यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनी भाषणातून जिजामाता , स्वामी विवेकानंद यांच्या मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी छान भाषण केले त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले . प्रथम क्रमांक , यु.के.जी चा विद्यार्थी स्वप्निल धनराज मुंडे. द्वितीय क्रमांक, रणवीर जाधव, तृतीय क्रमांक शुभ्रा साबळे. यामुळे प्रमुख उपस्थिती पालक घुमरे मॅडम, काटे मॅडम, शितल मस्के मॅडम, आनंद सर, मोरे मॅडम, लव्हाळे मॅडम, खुलते मॅडम, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सूत्रसंचालन आडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन खुलते मॅडम यांनी केले. शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.








