#अशा भयाण प्रसंगी न,प मलेरिया विभागाची जंतुनाशक फवारणी करण्यास टोलवाटोलवी-नगर सेवक विकास जोगदंड

Beed

अशा भयाण प्रसंगी न,प मलेरिया विभागाची जंतुनाशक फवारणी करण्यास टोलवाटोलवी-नगर सेवक विकास जोगदंड

जिकरीच्या वेळी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करावी-नगर सेवक विकास जोगदंड

बीड/प्रतिनिधी

कोरोना या विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात संचार बंदी लागू असुन शासकीय यंत्रणेसह प्रत्येक घटक या विषाणुला प्रतिबंधित करण्यासाठी उपाययोजना आखत आहे खबरदारीचा उपाय म्हणून बीड नगरीचे कर्तव्यनिष्ठ नगराध्यक्ष यांच्या कार्य तत्परतेने नगर परिषदेच्या सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या असुन यात प्रामुख्याने स्वच्छता व आरोग्य विभागाची महत्वाची भूमिका असुन स्वच्छता विभाग खरडून कामाला लागला असुन मलेरिया विभागाकडून मात्र आपल्या कर्तव्यात हलगर्जी पणा केल्याचे जाणवत आहे.

या पूर्वी ही मलेरिया विभागाचे काम असमाधानकारक असुन एका प्रभागातील प्रमुख एक दोन गल्यात धूर फवारणी केली की झालं सगळा प्रभाग पुर्ण केला असा देखावा केला जात असल्याचे ही सर्वश्रुत केवळ ठरवावीक प्रभागातच जंतु नाशक फवारणी केली जात असुन आमच्या प्रभागा बाबत असा दुजा भाव का? सध्या परिस्थिती काय आहे याचे ही गांभीर्य मलेरिया विभागातील प्रमुख कारभार हाकणाऱ्यानां नसावे या वरून त्यांचा बेजबाबदार पणा लक्षात येतो.

सद्यस्तिथीत मलेरिया विभागामार्फत शहरात जंतु नाशक फवारणी चे काम सुरु असुन यात ही टगळमंगल होत आहे वारंवार संबधित कर्मचाऱ्यानां प्रभागातील जनहिताच्या दृष्टीने जंतु नाशक फवारणी करण्यात यावी या साठी सूचित करून विनंती करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे आमचा प्रभाग मागास्वर्गीयांचा कष्टकऱ्यांचा आहे इथे ही माणसं रहातात प्रत्येक वेळी आम्हाला संघर्षचं करावा लागत आहे.

जनहितासाठी कायम आपण संघर्ष करत राहू परंतु हा काळ गांभीर्याने कार्य करण्याचा आहे हे नगर परिषद मलेरिया विभागाला का समजतं नाही एकंदरीत या सर्व प्रकारावरून न प मलेरिया विभागाचे प्रमुख कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचे स्पष्ट पणे जाणवत असुन आमच्या प्रभागात तात्त्काळ जंतुनाशक फवारणी करण्याच्या सूचना संबधित विभागाला देऊन कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी मलेरीया विभाग प्रमुखांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक विकासजी जोगदंड यांनी केली असुन या बाबत उद्या मा जिल्हाधिकारी, मा नगराध्यक्ष मा मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे ही नगरसेवक विकासजी जोगदंड यांनी पत्रकातुन सांगितले आहे.

Sharing

Visitor Counter