"काही भाड'काऊ नेते आणि दिशाहीन राजकारण: एक कटु वास्तव"

"काही भाड'काऊ नेते आणि दिशाहीन राजकारण: एक कटु वास्तव"
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. प्रत्येक सुजाण नागरिकाने या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मात्र काही स्वार्थी, भाड'काऊ नेते या प्रसंगाचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत, हे पाहून संताप अनावर होतो.
आतंकवाद्याला ना जात असते, ना धर्म असतो. दहशतवाद हा मानवतेविरोधी अपराध आहे. पण काही नीच राजकीय नेत्यांना यातही जातीधर्माचा रंग भरायचा आहे. हे लोक समाजात विष पेरून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यात व्यग्र आहेत. देशवासीयांच्या दुःखावर यांचा डाव साधतो आहे. शरमेने डुबून मरावं अशी यांची अवस्था झाली आहे.
या हल्ल्यात फक्त एका समाजाचे नाही, तर सर्व समाजातील निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. काही जिगरबाज मुस्लिम युवकांनीही पर्यटकांना वाचवताना प्राण गमावले, हे सुद्धा या अंध नेत्यांच्या डोळ्यांना दिसत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या मुस्लिम वीराच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला, पण याचा उल्लेखही काही राजकीय भिकाऱ्यांनी केला नाही.
खरं पाहायला गेलं तर केंद्र सरकार व गृहमंत्रालय यांची ही मोठी अपयशाची घटना आहे. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असताना हे घडणं म्हणजे थेट त्यांच्या नाकर्तेपणाची साक्ष आहे. या घटनेवर सरकारला जाब विचारण्याऐवजी काही भाड'काऊ नेते लोकांना जातीच्या, धर्माच्या नावावर भडकवत आहेत. लोकांच्या दुःखाचं विक्रीस काढलं जात आहे आणि आपण मूग गिळून गप्प आहोत.
जर त्या हल्ल्यात मरणाऱ्यांच्या जागी आज द्वेषाचं राजकारण करणारे नेते असते, तर कदाचित त्यांना समजलं असतं दुःख म्हणजे काय असतं! पण सत्तेच्या माजात त्यांना सामान्य जनतेचं दुःख दिसत नाही.
भारताला जातीधर्माच्या विळख्यातून बाहेर काढायला हवं, पण याच विळख्यात देशाला अडकवण्याचं काम आजचे काही राजकीय बुडबुडे करत आहेत. एकीकडे देशाची सीमारेषा रक्ताने भिजते आणि दुसरीकडे याच देशात समाजमनाला विषबाधित केलं जातं, हे पाहून खरंच भारताची स्थिती अतिशय बिकट झाली आहे.
आता तरी जनतेने जागं व्हायला हवं. जातीधर्माच्या आंधळेपणापेक्षा माणुसकीला प्राधान्य द्यायला हवं. हल्ला कोणीही घडवला असो, तो देशद्रोहाचं मूर्तिमंत उदाहरण आहे, आणि देशद्रोह्यांना जात-धर्म नसतो! भिकारी राजकारण करणाऱ्या निर्लज्ज नेत्यांनो — जरा आरशात बघा!
दादर येथे एका युवकाला "तुझं नाव काय?" असे विचारून मारहाण करण्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. विशेषतः ही मारहाण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झाली, ही बाब अधिकच धक्कादायक आहे. ज्यांच्यावर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांचेच पदाधिकारी अशा प्रकारे अन्याय करत असतील, तर ही लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे. सरकारचा आणि पक्षाचा निषेध केला पाहिजे, कारण जनतेला भीतीत ठेवणं किंवा जातीपातीच्या आधारावर भेदभाव करणं हे कोणत्याही प्रकारे मान्य करता येणार नाही. युवकाला फक्त त्याच्या नावावरून मारहाण करणे हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा सरळ उल्लंघनच म्हणावं लागेल..!
काझी समीरोद्दिन
मो.9049904996








