" राष्ट्रीय क्रीडा दिन " म्हणून विविध उपक्रमांनी साजरा

Beed

" राष्ट्रीय क्रीडा दिन " म्हणून विविध उपक्रमांनी साजरा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट  " राष्ट्रीय क्रीडा दिन " म्हणून उत्साहात संपन्न                -

 दि. २९::-" राष्ट्रीय क्रीडा दिन " हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांनी महाराष्ट्र शासना  च्या शालेय शिक्षण व क क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय  तथा जिल्हा क्रीडा परिषद,  बीड  मार्फत साजरा करण्यात आला .
 यावेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी माननीय प्राध्यापक जेपी शेळके , जिल्हा क्रीडा अधिकारी मा . अरविंद विद्यागर , तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे ,  बीड जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रा .  दिनकर थोरात ,  बीड जिल्हा हॉकी संघटनेच्या उपाध्यक्षा  माननीय डॉ .  कविता गीते ( कराड ),  राज्य युवा पुरस्कारार्थी माननीय तत्वशिल कांबळे ,   क्रीडा संघटक माननीय शरद आंदुरे , क्रीडा संघटक माननीय विनायक वझे , क्रीडा संघटक माननीय उद्धव कराड , क्रीडा संघटक माननीय रामदास गिरी जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थि  तथा क्रीडा संघटक मा .  डॉ .  अविनाश बारगजे , जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी तथा क्रीडा संघटक मा  प्रा तानाजी आगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला .                                           कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला . सदर प्रसंगी गुगल मीट या वेबव्दारे  मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर व खेळावर   माननीय प्राध्यापक जे पी शेळके सर ,   प्राध्यापक दिनकर थोरात , मा . तत्वशिल कांबळे , डॉ .  कविता गीते (कराड) ,  माननीय विनायक वझे यांनी मार्गदर्शन केले .              प्राध्यापक जेपी शेळके सर यांनी  मेजर ध्यानचंद यांच्या विषयी त्यांचा हॉकी या खेळातील खडतर जीवन प्रवास  व त्यांनी राष्ट्रासाठी केलेली महान कामगिरी यावर प्रकाश टाकला .  खेळासाठी सुविधा उपलब्ध नाहीत म्हणून रडत न बसता विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांचा आदर्श समोर ठेवून खेळात आपली कामगिरी दाखवावी असे आव्हान शेळके सर यांनी केले .  तसेच  क्रीडा संकुलात मेजर ध्यानचंद यांचा पुतळा विद्यार्थ्यांना एक आदर्श समोर ठेवावा म्हणून बसवण्यात यावा ही मागणीही प्राध्यापक शेळके, प्रा दिनकर थोरात ,  विनायक वझे यांनी याप्रसंगी केली .                        सदर प्रसंगी क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील हॉकी खेळात राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेल्या महिला हॉकी खेळाडू कु .  उस्वाते हुस्ना शेख नजीर या खेळाडूचा व आंतरराष्ट्रीय खोखो स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेल्या तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांचा प्रातनिधीक   स्वरूपामध्ये प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला .                    .    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले तर आभार श्रीमती सुप्रिया गाढवे यांनी मानले .                   कार्यक्रमा नंतर बीड जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने " सायकल रॅली "  " फिट इंडिया फ्रीडम रण " या उपक्रमाचा शुभारंभ प्रमुख अतिथींच्या  शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला .  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धनेश करांडे ,  गोवर्धन पवार , विजय जाहेर , कल्यान काळे , सचिन जाधव ,  किशोर काळे , शेख नजीर यांनी परिश्रम घेतले

Sharing

Visitor Counter