" राष्ट्रीय क्रीडा दिन " म्हणून विविध उपक्रमांनी साजरा

" राष्ट्रीय क्रीडा दिन " म्हणून विविध उपक्रमांनी साजरा
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट " राष्ट्रीय क्रीडा दिन " म्हणून उत्साहात संपन्न -
दि. २९::-" राष्ट्रीय क्रीडा दिन " हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांनी महाराष्ट्र शासना च्या शालेय शिक्षण व क क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड मार्फत साजरा करण्यात आला .
यावेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी माननीय प्राध्यापक जेपी शेळके , जिल्हा क्रीडा अधिकारी मा . अरविंद विद्यागर , तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे , बीड जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रा . दिनकर थोरात , बीड जिल्हा हॉकी संघटनेच्या उपाध्यक्षा माननीय डॉ . कविता गीते ( कराड ), राज्य युवा पुरस्कारार्थी माननीय तत्वशिल कांबळे , क्रीडा संघटक माननीय शरद आंदुरे , क्रीडा संघटक माननीय विनायक वझे , क्रीडा संघटक माननीय उद्धव कराड , क्रीडा संघटक माननीय रामदास गिरी जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थि तथा क्रीडा संघटक मा . डॉ . अविनाश बारगजे , जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी तथा क्रीडा संघटक मा प्रा तानाजी आगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला . सदर प्रसंगी गुगल मीट या वेबव्दारे मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर व खेळावर माननीय प्राध्यापक जे पी शेळके सर , प्राध्यापक दिनकर थोरात , मा . तत्वशिल कांबळे , डॉ . कविता गीते (कराड) , माननीय विनायक वझे यांनी मार्गदर्शन केले . प्राध्यापक जेपी शेळके सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या विषयी त्यांचा हॉकी या खेळातील खडतर जीवन प्रवास व त्यांनी राष्ट्रासाठी केलेली महान कामगिरी यावर प्रकाश टाकला . खेळासाठी सुविधा उपलब्ध नाहीत म्हणून रडत न बसता विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांचा आदर्श समोर ठेवून खेळात आपली कामगिरी दाखवावी असे आव्हान शेळके सर यांनी केले . तसेच क्रीडा संकुलात मेजर ध्यानचंद यांचा पुतळा विद्यार्थ्यांना एक आदर्श समोर ठेवावा म्हणून बसवण्यात यावा ही मागणीही प्राध्यापक शेळके, प्रा दिनकर थोरात , विनायक वझे यांनी याप्रसंगी केली . सदर प्रसंगी क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील हॉकी खेळात राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेल्या महिला हॉकी खेळाडू कु . उस्वाते हुस्ना शेख नजीर या खेळाडूचा व आंतरराष्ट्रीय खोखो स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेल्या तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांचा प्रातनिधीक स्वरूपामध्ये प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला . . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले तर आभार श्रीमती सुप्रिया गाढवे यांनी मानले . कार्यक्रमा नंतर बीड जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने " सायकल रॅली " " फिट इंडिया फ्रीडम रण " या उपक्रमाचा शुभारंभ प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धनेश करांडे , गोवर्धन पवार , विजय जाहेर , कल्यान काळे , सचिन जाधव , किशोर काळे , शेख नजीर यांनी परिश्रम घेतले








