लोकसेना संघटनेकडून होळ हल्लेचा जाहीर निषेध समाजावर अजुन किती हल्ले सहन करायचे

Beed

लोकसेना संघटनेकडून होळ हल्लेचा जाहीर निषेध समाजावर अजुन किती हल्ले सहन करायचे 

बीड/प्रतिनिधी 

आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी धारूर येथील तबलिग जमातचे अमीर(प्रमुख) काझी निजामुद्दीन व त्यांचे साथीदार अंबाजोगाई  येथे एका अंत्यविधी कार्यासाठी जात असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या कार मध्ये तांत्रिक अडचणी झाल्याने ते रस्त्याच्या बाजूला थांबले होते. या वेळी काही अज्ञात समाजकंटकांनी  जातीवाचक व धार्मिक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात काझी निजामुद्दीन व सोहेल तांबोळी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा लोकसेना संघटना जाहीर निषेध करत आहे कारण पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाने हल्ला होणे खुप चिंताजनक बाब आहे. धर्माच्या आधारावर मारहाण करणे म्हणजे एका प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावर हल्ला करणेच आहे. जिल्ह्यात व राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडेल व सामाजिक वातावरण दूषित होईल या अनुषंगाने धर्माच्या नावावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटक दहशतवाद्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून UAPA, NSA कायदा व कलम 295A अंतगर्त गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, व सरकारला लोकसेना संघटने कडून  विचारणा करण्यात आली की देशात व राज्यात मुस्लिम समाजावर अजुन किती हल्ले सहन करायचे शासन समाजाच्या संरक्षनासाठी अटरासिटी सारखा कड़क कायदा कधी बनवनार व समाजाला संरक्षण कधी देणार?  वरील मागणी लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, गृहमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी बीड व पोलिस अधीक्षक बीड यांना केली आहे.

Sharing

Visitor Counter