युवाजन श्रमिक फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव दिग्विजय दळवी यांच्यावतीने बीड शहरातील गरजू कुटुंबियांना मोफत किराणा साहित्य .

Beed

बीड/प्रतिनिधी
सध्या सर्वत्रच लोक डाऊन केले असल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज अनेकांचे हातावर पोट असल्याने दररोज काम केल्यानंतर त्यांच्या त्याच्यावर उपजीविका असलेल्यांचे पोट भरणार  आहे परंतु सर्वत्र बंद असल्याने सध्या अशा लोकांवर मोठे संकट आले आहे अशा परिस्थितीत शासन तसेच अनेक दानशूर संस्था व्यक्ती पुढे येत आहेत.

बीड येथील "युवाजन श्रमिक फाउंडेशन" व  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव "दिग्विजय दळवी" यांनी बीड शहरातील शंभर गरजू कुटुंबीयांना दोन महिने पुरेल एवढे मोफत किराणा साहित्य वाटप केले. 

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिग्विजय दळवी युवाजन श्रमिक फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय दळवी शुभम वाघमारे, स्वप्नील दळवी, श्रीमंत सुरवसे आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter