ग्रामीण भागात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अंगणवाडी सेवीका पुढे.

ग्रामीण भागात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अंगणवाडी सेवीका पुढे
तलाठी, ग्रामसेवकही देत आहेत योगदान
बीड/प्रतिनिधी
कोरोना या जिवघेण्या साथीवर वेळीच नियंत्रण आनण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. सारा देश लॉकडाऊन करण्यात आला असला तरी मागील काही दिवसात पुणे- मुंबई व ईतर शहरात वास्तव्यास असलेले लोक आपल्या गावी परतले आहेत. या लोकांच्या नोंदी ठेवणे, संशीयीतांचे होम कॉरन्टाईन करणे, शासन- प्रशासनाला माहिती कळवणे आदी कोरोनाशी दोन हात करण्याच्या कामामध्ये अंगणवाडी सेविका तसेच तलाठी आणि ग्रामसेवक महत्वाची भूमिका निभावत आहेत.
शासनाच्या बहुतांश योजना आणि उपक्रमांमध्ये अंगणवाडी सेविका ह्या सातत्याने योगदान देतात. दोन महिन्यापुर्वी चिन येथे कोरोना व्हायसची साथ पसरल्यानंतर भारतात सर्वप्रथम केरळ येथे कोरोनाचा रूग्ण आढळून आला. यानंतर महाराष्ट्रात पुर्ण येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलत शाळा, महाविद्यालये, सरकारी, खाजगी कार्यालये, कंपन्या, कारखाने, बस, रेल्वे, विमान आदी सर्व सेवा बंद केल्या. एवढ्यावरच न थांबता सारा महाराष्ट्र लॉक डाऊन करत 144 कलम लागू केले. दरम्यान महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यापुर्वीच पुणे- मुंबई व ईतर शहरात उद्योग, व्यवसाय, नोकरी व काम- धंद्याच्या निमित्ताने वास्तव्यास अलेले बहुतांश लोक ग्रामीण भागातील आपल्या गावी परतले होते. या गावी आलेल्या लोकांपैकी एखादी व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह असू नये अन् असलीच त्याच्यापासून ईतरांना कोरोनाची लागन होऊ नये याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली. यासाठी जिल्हाधिकारी यांनी गाव पातळीवर अंगणवाडी सेविका यांना स्थालांतरीत लोकांच्या नोंदी घेणे, कोणाला लक्षणे आहेत का? याची माहिती घेणे, ज्यांच्यात लक्षणे आढळतील त्यांना होम कॉरन्टाईन करणे ही कामे करण्यासाठी अंगणवाडी सेविका तसेच तलाठी, ग्रामसेवक हे जिल्हा प्रशासनाला मोलाची मदत करत आहेत.
गाव पातळीवर कोरोनाशी लढणार्या आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे देखील कौतुक झाले पाहिजे. कारण सध्या ग्रामीण भागात त्या कोरोनाशी दोन हात करत आहेत.








