वडवणीच्या दुध विक्रेत्यांवर पोलिसांचा पडला दांडा.

#वडवणीच्या दुध विक्रेत्यांवर पोलिसांचा पडला दांडा वडवणी/प्रतिनिधी ग्रामीण भागातून शहरात दुध विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांना आज सकाळी वडवणी पोलीसांचा समाना करावा लागला तर काहीचा सिटावर पोलीसांचा दंडा पडला असल्याने काही विक्रेता गल्ली-बोळीत धुम ठोकली असल्याने ’पोलीस मारीत आहेत’ अशी चर्चा ऐकू येत होती.तर काही जण दुचाकी जाण्यासाठी मार्ग कोणता आहे.असे विचारत होते.
कोरोना वायररसचा संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन कठोर पावलं उचलत आहेत.तर जनतेनी घराबाहेर न पडता सुचनेचे काटेकोरपणे पालन करावं अशी सुचना देण्यात आल्याआहेत.परंतु आज ही काही टावाळखोर लोक याचं पालन करताना दिसून येत नाहीत.आज सकाळी तर थेट दुध विक्रेत्यांनाच वडवणी पोलीसांचा समाना करावा लागला असाल्याने दुध विक्रेत्यामधे काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
तर काहीना काठीचे रट्टे पडल्यानंतर काही दुध विक्रत्यांनी दुध न घालता थेट आड मार्गाने थेट घराचा रस्ता धरला आहे.आमचा गांवाला किंवा शहराला बाहेर जाण्यासाठी इंकडून रस्ता आहे का? रोडवर दिसलं कि पोलीस खरच मारीत आहेत? असं म्हणत पारी चालणारे व दुचाकीवर बसून दुध विक्री करणारे विक्रेत्यामधेआज सकाळ चांगलीच तारांबळ उडाली असल्याने दिसेले रस्त्याचा गल्ली-बोळीतून मार्ग काढत दुध विक्रत्यांनी घरचा रस्ता धरला आहे.
आज चौथा दिवशी हि संचार बंदीचे पालन म्हणुन पुर्णपणे लॉकडाऊन पाहवयास मिळाले आहे.तर काही हवसे नवसे रुवक रोडवर दिसले तर पोलीसांकडून गर न करता डुंगणावर रट्टे देवून मोकळे करीत आहेत.पोलीस मुखयरस्त्यवर ठांण मांडून कर्तव्य चोख पणे बजावत असल्याने पोलीसांचा वर्क आऊटचे सुज्ञ नागरिक स्वागत करत आहेत. तर दुध विक्रेत्यांचा अंगावर पोलीसाचे दंडे पडल्याने त्यांची मात्र फिजिती झाली असल्याने उद्यापासुन दुध विक्रेते येतील का नाही हे सांगणे जरा कठीण झाले आहे.








