खडकी देवळा शिवारातील मध्यम प्रकल्प फुटण्याच्या मार्गावर !

Beed

खडकी देवळा शिवारातील मध्यम प्रकल्प फुटण्याच्या 
 मार्गावर 

वडवणी/दत्ता करडे

खडकी देवळा या दोन्ही शिवारातील मध्यम प्रकल्प ( साठवण तलाव) हा खडकी शिवारात आहे. या तलावाला (सायळ) या प्राण्याने तळ्याची भिंत ही तीन वर्षे झाले कोरून, कोरून भिंतीला मोठे मोठे भोगदे पडून भिंत फुटण्याच्या मार्गावर आहे. भिंत ४०ते ५० फुट खचली आहे. या आस पास च्या नागरिकांनी दि.७/३/२०१८ साली तहसील कार्यालय वडवणी येथे निवेदन दिले असून प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केले आहे. याचे कारण आम्हला प्रशासनाने कळवावे ही येथील नागरिकांची मागणी आहे .
आज दि.२४/९/२०२०
रोजी परत तहसील कार्यालयाला निवेदन दिले आहे. तरी मा. तहसीलदार साहेबानी या तलावा वर येऊन प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहणी करून जावे. असे येथील नागरिक निवेदनात दाखल आहे. सदरील तलाव जर फुटला आणि काही जीवित हानी घडली तर याला प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे सांगितले आहे.

Sharing

Visitor Counter