जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाइन मार्गदर्शन सत्र

Beed

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाइन मार्गदर्शन सत्र
    
    बीड/प्रतिनिधी 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योगकता मार्गदर्शन केंद्र,बीड यांचे मार्फत दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11.20 वाजता "मुलाखतीची तयारी" या विषयावर डॉ.अनिल जाधव, समन्वयक,श्रम व रोजगार मंत्रालय,भारत सरकार हे मार्गदर्शन करणार आहेत.
    सदर ऑनलाईन सत्रास जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार, स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, खाजगी कंपन्यामध्ये नोकरी करण्यास इच्छुक  उमेदवारांनी आपल्या अँड्रॉईड मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर मधून "झूम ॲप" इन्स्टॉल करावे. त्यानंतर  http://us04web.zoom.us/j/76914166605?pwd=cmdYNjFWNXpadlp 0dXQ3L05obTRNZz09 या लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन सत्रामध्ये सहभागी व्हावे.
    याबाबत काही अडचण असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02442-222348 या दूरध्वणीवर क्रमांकवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या ऑनलाईन कौन्सिलिंग सत्राचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री.एस.आर.वराडे, सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,बीड यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter