व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही-चित्राताई वाघ

व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही-चित्राताई वाघ
बीड/वार्ताहर
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची आज भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी बोलताना त्यांनी म्हटल, महाराष्ट्रात विधानसभा व लोकसभेच्या मोर्चा बांधणीसाठी महिलांचे मोठी फळी निर्माण करत आहोत, केंद्र व राज्य शासनाच्या योजना याची पूर्ण माहिती गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचावी हाच या दौऱ्याचा उद्देश आहे. उर्फी जावेद तिच्या संदर्भात प्रश्न विचारतात चित्राताई या म्हटल्या महाराष्ट्रात नंगानात चालू देणार नाही, माझी लढाई व्यक्तीशी नाही विकृतीची आहे, विरोधकांनी हा राजकारणाचा विषय केला आहे मात्र हे राजकारणी विषय नसून सामाजिक विषय आहे, माझ्यावर कितीही खटले दाखल झाले तरी घाबरणार नाही माझी लढाई सुरूच राहणार, सामान्य महिलांच्या प्रश्नावर काम करत राहणार, व्यक्ती स्वतंत्र्याच्या नावाखाली नंगानाच खपून घेतला जाणार नाही यासह मंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारतात त्यांनी सदरील प्रकरण हे न्यायालयात असून आपण ऑनलाइन पाहू शकता असे म्हटले, या पत्रकार परिषद वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के सर्जेराव तांदळे संगीता धसे यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.








