सीए परीक्षेतील गुणवंताचा मातृभूमी व ज्ञानसागर च्या वतीने सत्कार

सीए परीक्षेतील गुणवंताचा मातृभूमी व ज्ञानसागर च्या वतीने सत्कार
बीड/प्रतिनिधी
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलेल्या काही गुणवंत विद्यार्थ्यांचे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मातृभूमी प्रतिष्ठान व ज्ञानसागर गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने नगर रोड वरील ज्ञानसागर गुरुकुल हॉलमध्ये दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी रोशन बंब आचल बेदमुथा दिव्या सिकची चांडक केदार ऐश्वर्या तापडिया श्रद्धा बंब या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांनी सीए परीक्षा बद्दल व अभ्यासक्रमाबाबत मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच पत्रकार प्रा बालाजी जगतकर यांनी देखील मुलांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सिद्धार्थ केदार याने अतिशय सुंदर असं स्वागत गीत गायन केले प्रस्ताविक डॉ संजय तांदळे अध्यक्षीय समारोप डॉ लक्ष्मण पवळ सूत्रसंचालन गणेश सानप आभार रवी सानप यांनी मानले कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक ओम प्रकाश सिकची चांडक ओम प्रकाश रेणुका तापडिया सह लक्ष्मण चाटे प्रा बाळासाहेब नागरगोजे बाळू जाधव सौ सानप मॅडम आदी मान्यवर विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.








