शेतकरी व कामगार विरोधी बिल रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

Beed

शेतकरी व कामगार विरोधी बिल रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
हाथरस घटनेचा निषेध करून मुख्यमंत्री योगीचा पुतळा जाळला

अबंड/वार्ताहर 
 अबंड येथे शुक्रवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी पूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस तहसील प्रांगणात पुष्पहार अर्पण करून शेतकरी व कामगारांच्या मुळावर असलेले 
शेतकरी व कामगार विरोधी बिल रद्द करून उद्योगपती धार्जिने केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध अखिल भारतीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राणा यांच्यासह केदार कुलकर्णी, मुस्ताक शेख,अकबर शेख,कैलास राठोड,खुर्शिद जिलानी,शकील शेख,जाकेर डावरगावकर,अविनाश वडगावकर,प्रकाश नारायणकर यांनी निषेध नोंदवून तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन दिले.

बुधवारी उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील पीडित मयत कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रियंका गांधी यांना यूपी सरकारच्या पोलिसांनी धक्काबुक्की करत रस्ता आडवल्याने यूपीए सरकारच्या पोलिसांचा जाहीर निषेध नोंदवत मा. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.तसेच शेतकरी व कामगारांच्या मुळावर शेतकरी व कामगार विरोधी विधेयक रद्द करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबड तहसीलसमोर निषेध नोंदवत सुमारे ०२ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करून तहसीलदार कडवकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे संभाजी गुढे,वैजिनाथ पा.डोगंरे, दीपक लोहकरे, बाबासाहेब घोलप, सलमान बागवान, रविंद्र डोंगरे, प्रल्हाद उगले, हुजेर काझी,नवाज पटेल, मा.हरिभाऊ गोडसे,हमीद शेख,मोहसीन हाश्मी, अर्जुन जाधव गुलाब राठोड, आत्माराम राठोड साईनाथ वाघमारे सोनाजी जाधव ज्ञानेश्वर माने दिलीप हरीभाऊ जाधव प्रशांत घुगे विजय मुंडे विष्णू गायकवाड पाटील भाई पाशा आणि त्यामुळे सादिक भागवत सतीश काळे नारायण वाघमारे, अब्दुल शेख प्रकाश जाधव साहेबराव परमेश्वर चव्हाण सावरगावकर चंद्रभाग जाधव राहुल कारके, संदीप जोगदंड यांची उपस्थिती होती.

 

 उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचा निषेध नोंदवत अंबड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले, योगी मुर्दाबाद, मोदी सरकार हाय-हाय  घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंबड परिसर दणाणून सोडला.

Sharing

Visitor Counter