रस्ता सुरक्षा विषयक निबंध स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेत विजेत्यांना पारीतोषिक वितरण

Beed

रस्ता सुरक्षा विषयक निबंध स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेत विजेत्यांना पारीतोषिक वितरण

 परळी/वार्ताहर 

दि. 19 :-केंद्र शासनाने राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह दि. 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 या कालावधीकरिता आयोजित केले असून रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन 2023 या वर्षात रस्ता सुरक्षा अभियान आयोजनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबविणेत आले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई आणि विद्यावर्धिनी विद्यालय परळी येथे (दि. 16 रोजी) विद्यावर्धिनी विद्यालय परळी येथे सकाळी 8.30 वाजता उदबोधन शिबीर संपन्न झाले.

 

          या उद्बबोधन शिबीरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यालयात रस्ता सुरक्षा विषयक निबंध स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईतर्फे स्पर्धेत प्रथम आलेल्य विद्यार्थ्यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दिलीप निळेकर यांच्या हस्ते बक्षस वितरण करण्यात आले. यामध्ये रस्ता सुरक्षा माझी जबाबदारी निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. प्राप्ती शरद घनचेकर इयत्ता 8 वी व अनुक्रमे व्दितीय कु. आदिती राजेभाऊ शिंदे, चि. यश दिपक रेनगडे, कु. वेदांती आदुडे, कु. शुभांगी केंद्रे तसेच घोषवाक्य स्पधेंत प्रथम कु. सिध्दी पिसे , व्दितीय चि. सार्थक घनचेकर, तृतीय कु. गौरी सोमाणी, उत्तेजनार्थ कु. समिक्षा भोयटे, कु. सेजल पवार आदीनी पारितोषिक पटकावले.

 

      यावेळी विद्यावर्धिनी विद्यालयाचे संचालक श्री. भिंगोरे, प्राचार्य मेश्राम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरिक्षक दिलीप निळेकर, मुख्याध्यापक श्री. माथेकर, श्री. सुंमठाणे, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील इतर सहा मोटार वाहन निरिक्षक व कर्मचारी संजय शेळके, राहूल बळवंत, उपस्थित होते. निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यासाठी दादाराव सुर्यवंशी यांचे योगदान लाभले. आभार प्रदर्शन शरद घनचेकर यांनी केले. वैद्यनाथ महाविद्यालयात पॉवरपॉईन्ट प्रेझनटेशनव्दारे रस्ते अपघात व रस्ता सुरक्षा विषयक माहिती देण्यात आली. 

Sharing